Download App

Sharad Pawar : राष्ट्रवादी भाजपसोबत? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला…

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी ठणकावून सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि शरद पवार यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात कमालीचा सस्पेंन्स निर्माण झाला होता. ही भेट नेमकी कशासाठी? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती, अशातच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. अखेर शरद पवारांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Thane Hospital News : ‘शासन आपल्या दारी म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारातच आरोग्य सुविधांचा अभाव’

तसेच अजित पवार माझा पुतण्या आहे, कुटुंबातील व्यक्तीने वडिलमाणसाला भेटणं यामध्ये गैर काय आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजचपची विचारधारा आम्हाला मान्य नसल्यामुळे भाजपसोबत जाण्याचा प्रश्न येत नसल्याचंही शरद पवार यांनी अजित पवार भेटीनंतर स्पष्ट केलं आहे.

राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ पक्षाची पुढील रणनीती कशी असणार आहे. याबद्दल भााष्य केलं आहे. ते म्हणाले, 31 तारखेला मुंबईत प्राथमिक अजेंडा ठरवण्याची बैठक पार पडणार आहे. 1 सप्टेंबरला मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये बैठक 30 ते 40 नेते एकत्र येणार आहेत. मी उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये अजेंड्यासह काही त्रुटींवर चर्चा करण्यात येणार आहे. ‘इंडिया’ला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याचे परिणाम पुढील काळात दिसून येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

मणिपूर प्रकरणावरही बोलतानाही त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. मणिपूरचा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. मणिपूर राज्याचा काही भाग संवेदनशील आहे. मणिपूर हे नॉर्थ भागात येतं. त्यामुळे लोकसभेत पंतप्रधानांनी देशाच्या हिताची भूमिका मांडायला हवी होती. पण राजकीय दृष्ट्या कसे हल्ले होतील, अशीच भूमिका पंतप्रधानांनी मांडली असल्याची टीका पवार यांनी केली आहे.

Tags

follow us