Download App

‘त्या’ सहकाऱ्यांची भूमिका दोन दिवसांत समोर येईल, बंडानंतर शरद पवारांचं मोठं विधान…

Sharad Pawar News : अजित पवारांसोबत शपथविधी घेतलेल्या सदस्यांची भूमिका दोन-तीन दिवसांत समोर येणार असल्याचं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान, अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली आहे.

दादांच्या शपथविधीला लंके राजभवनात अन् म्हणतायत…मला माहितच नाही काही

राज्यात आज सकाळपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणा महाभूकंप घडला आहे. अजित पवारांनी आपल्या 9 सहकाऱ्यांनासोबत नेत राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावर अखेर शरद पवारांनी मौन सोडलं आहे.

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून माझी त्यांच्याविरोधातच भूमिका आहे. 6 तारखेला होणाऱ्या बैठकीत पक्षाची संघटनात्मक चर्चा होणार होती. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार होती. मात्र, त्याआधीच सहकाऱ्यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली आहे.

अजित पवारांसोबतचे काही सदस्य माझ्या संपर्कात आहेत. त्यांनी माझ्याकडे त्यांची भूमिका स्पष्ट केली. अजित पवारांसोबतच्या सहकाऱ्यांची भूमिका दोन ते तीन दिवसांत समोर येणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. सध्या जो प्रकार घडला आहे, तो मला काही नवीन नाही.

Maharashtra Politics : ज्यांना कंटाळून शिंदे गट फुटला; त्याच अजितदादांसाठी घातल्या पायघड्या!

याआधीही असा प्रकार 1980 मध्ये घडला होता. त्यावेळीही 58 आमदारांपैकी 52 आमदार सोडून गेले होते. त्यावेळी विरोधी पक्षनेता होता.उर्वरित 6 जणांना सोबत घेऊन मी पक्ष पुढे चालवला, माझा मतदारांवर विश्वास असून पुन्हा जोमाने उभा राहणार असल्याचं शरद पवारांनी ठामपणे सांगितलं आहे.

दरम्यान, अजित पवार पक्षात नाराज असलेल्या चर्चांना काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यानंतर अजित पवारांनी आपल्याला संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं होतं. मात्र, त्यांनतर शरद पवारांनी भाकरी फिरवत प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केलं होतं. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी अजित पवार इच्छूक असल्याचं दिसून आलं होतं.

कोण आहे टीम इंडियाचा ‘फुटबॉल कोच’, जो मैदानांवर घालतो वाद

त्यानंतर आज सकाळी मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सुरु होती. अजित पवारांनी ही बैठक आयोजित केली. बैठकीनंतर अजित पवारांनी थेट राजभवन गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस यांच्यासमोर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय.

एवढंच नाहीतर अजित पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आमचा असून घड्याळ चिन्हावरच पुढील निवडणुका लढवणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. त्यानंतर आता शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Tags

follow us