दादांच्या शपथविधीला लंके राजभवनात अन् म्हणतायत…मला माहितच नाही काही

दादांच्या शपथविधीला लंके राजभवनात अन् म्हणतायत…मला माहितच नाही काही

Nilesh Lanke NCP : राज्याच्या राजकारणात एकच मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा पक्षामध्ये बंडाचे पाऊल उचलले आहे. पवार यांनी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांसह आज थेट राजभवन गाठत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत अहमदनगर जिल्ह्यातील तीन आमदार देखील आहे. यामध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके हे देखील आहे. यावेळी लंके यांना या शपथविधीबाबत विचारण्यात आले असता मलाच काही माहिती नाही असे लंके यांनी म्हंटले. तसेच त्यांनी यावर जास्त बोलणे टाळले.

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या खदखदीचा परिणाम अखेर राज्याच्या राजकारणात दिसून आला आहे. अखेर राष्ट्रवादीचा राजीनामा देत अजित पवार आपल्या 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकार सामील झाले आहेत. एवढंच नाही तर अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या आमदारांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील तीन आमदारांनी देखील हजेरी लावली आहे. यामध्ये प्रामुख्याने संग्राम जगताप, किरण लहामटे व निलेश लंके हे राजभवनात दाखल झाले आहेत.

मला काही माहीतच नाही…
अजित पवार यांनी पुन्हा एकदा बंड पुकारत आमदारांचा एक मोठा गट घेऊन थेट राजभवन गाठले. अजित पवार यांच्यासोबत आमदार निलेश लंके हे देखील उपस्थित होते. यावेळी लंके यांना अजित पवार यांच्या शपथविधीबाबत विचारण्यात आले. यावेळी आपल्याला काही माहीतच नाही अशी प्रतिक्रिया लंके यांनी दिली. तसेच त्यांना आणखी प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

Ajit pawar : शुक्रवारीच पदाचा राजीनामा दिला; बंडामागचं सत्य उघड करत अजितदादांचा गौप्यस्फोट!

शरद पवारांना देव मानणारे लंके दादांच्या गटात
दरम्यान यामध्ये विशेष म्हणजे लंके हे शरद पवार यांचा शब्द मानणारे अशी त्यांची ओळख होती. शरद पवार यांच्या कार्याचा आपल्यावर प्रभाव आहे असे अनेकदा लंके यांनी म्हंटले देखील आहे. कोविड काळात कोरोना सेंटरला शरद पवार यांचे नाव लंके यांनी दिले होते. राजकारणातील गुरु म्ह्णून लंके शरद पवार यांच्याकडे पाहत असत. मात्र आज अचानक लंके यांनी अजित पवार यांच्या बंडात सामील होऊन शरद पवारांना रामराम ठोकला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube