Download App

सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय, पण…; पहलगाम हल्ल्याबाबत पवार काय म्हणाले?

केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. काही चिंता नाही, पण पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट आहे.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : मंगळवारी (दि. 22)  पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. आता काही चिंता नाही, पण पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट आहे, असं पवार म्हणाले.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानींना रिटर्न टिकीट! पुण्यात किती पाकिस्तानी? जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला आकडा 

शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना पवार म्हणाले की, केंद्र सरकारला सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. आम्ही या प्रकरणात सरकारसोबत आहोत. पण, हा हल्ला सरकारने अधिक गांभीर्याने घेतला पाहिजे. गेले काही दिवस सरकारकडून सांगितलं गेलंय की, दहशतवाद आम्ही संपलला. आता काही चिंता नाही. दहशतवाद कमी होत असेल तर चांगलचं आहे. मात्र, पहलगामध्ये घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, सरकार कमी पडतय, हे समोर आलं. ही कमतरता सरकारने घालवायला हवी. देशावर हल्ला होत असेल आणि सरकार गांभीर्याने घेत असेल तर ही कमतरता दूर करण्यासाठी तातडीने पावलं उचलली पाहिजेत, काही कामात आम्हा लोकांचं सहकार्य राहिल, असं पवार म्हणाले.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींना दिलासा, न्यायालयाकडून नोटीस बजावण्यास नकार 

त्यांच्यावर सक्त कारवाई करा…
पवार पुढे म्हणाले की, इंटेलिजन्स फेल्युअर आहे हे सरळ दिसत आहे. पहलगाम हे त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित आहे. मी दोन-तीन महिन्यांपूर्वीच तिथे गेलो होतो. आपले लोक सातत्यने तिथं जातात. दहशतवाद्यांनी त्यांचे उद्दीष्ट साध्य केले हा जो निष्कर्ष काढला जातो, तो अधिक सावध करणारा आहे. आपण काळजी घ्यायला पाहिजे, असं म्हणत ज्यांनी हल्ले केले, त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याची गरज आहे, असं पवार म्हणाले.

एका विचाराने सरकारसोबत राहा…
या हल्ल्यानंतर आता सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारसोबत राहिलं पाहिजे. यात राजकारण आणता कामा नये. अतिरेक्यांनी जी कारवाई केली, ती देशाविराधात केलेली कारवाई आहे. देशाच्या विरोधात असं कोणी निर्णय घेतं, तिथं राजकारण करायचं नसतं, असंही पवार म्हणाले. अतिरेक्यांनी यापूर्वीही हल्ले करण्याची अॅक्शन घेतली. तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आज धर्माची चर्चा का होतेय?, असा सवाल पवारांनी केला.

follow us