Download App

अजित पवारांच्या कॅबिनवर असणार शरद पवारांचा वॉच; पाहा काय आहे प्रकरण?

Maharashrta Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन मंत्रिपदाची सुत्रे देण्यात आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे अजित पवारांना अर्थमंत्री पदासोबत नवीन दालनही देण्यात आलं आहे. तर या दालनामध्ये एक गोष्ट लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे तेथील शरद पवारांचा फोटो. त्यावरून असं दिसतय की, अजित पवार शरद पवारांसोबत नसले तरी देखील शरद पवारांची अजितदादांच्या कॅबिनवर नजर असणार आहे. ( Sharad Pawar watch on Finance Minister Ajit Pawar cabin After Cabinet Expansion )

खातेवाटपात शिंदे ठाम ? अजित पवार गटाची जबाबदारी भाजपचीच

खातेवाटप जाहीर केल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन मंत्रिपदाची सुत्रे देण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या दालणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवारांच्या कॅबिनमध्ये महापुरूषांच्या फोटोंसह शरद पवारांचा देखील फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार शरद पवारांपासून दूर गेले असले तरी देखील ते मनाने त्यांच्या जवळ असल्याचं यावरून दिसून येत आहे.

Baipan Bhaari Deva चित्रपटाची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरुच; दोन आठवड्यात गाठला मोठा टप्पा

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार लगेचच अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं आहे. अर्थ व नियोजन मंत्रिपदाची सुत्रे हाती येताच अजित पवारांनी मंत्रालयातील दालनात दाखल झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी अर्थ विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत वित्त विभागाचा आढावा घेतला आहे. या बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता उपस्थित होते.

Tags

follow us