Baipan Bhaari Deva चित्रपटाची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरुच; दोन आठवड्यात गाठला मोठा टप्पा

Baipan Bhaari Deva चित्रपटाची बॉक्सऑफिसवर घोडदौड सुरुच; दोन आठवड्यात गाठला मोठा टप्पा

Baipan Bhaari Deva : ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या मराठी चित्रपटाने सध्या बॉक्स आफिसवर चांगलंच धुमाकूळ घालत असल्याचे दिसून आहेत. तसेच या सिनेमाची जोरदार चर्चा देखील रंगत असल्याचे दिसून येत आहे. मग ते सिनेमागृह असो वा महिला मंडळ सर्वजणच या सिनेमाला हजेरी लावत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यात आता या चित्रपटाने दोन आठवड्यात केली तब्बल 37.35 कोटींची कमाई केली आहे. ( Baipan Bhaari Deva box office Collection earn 37.35 core in two week )

अर्थमंत्री होताच दादा अ‍ॅक्शन मोडमध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करीत घेतला आढावा…

केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमाने रिलीजच्या दोन आठवड्यातच कमाईचा धुमाकुळ घातला आहे. या सिनेमाने चांगलाच गल्ला कमावला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसत आहे. पहिल्याच आठवड्यात 12.50 कोटी, दुसऱ्याच रविवारी एका दिवसांत 6.10 कोटी पहिला मराठी चित्रपट ठरला. तर दुसऱ्या आठवड्यात 24.85 कोटींची कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असले तरी थिएटरमधील गर्दी ओसरलेली दिसत नाही. 

मंत्रिपदाची सुत्रे हाती येताच दादांचा पाय खोलात? लवासा प्रकरणी उच्च न्यायालयात 21 जुलैला सुनावणी

‘बाईपण भारी देवा’ या मराठी सिनेमाचा टार्गेट ऑडियन्स हा महिलावर्ग असल्याचे दिसून येत आहे. भजनीमंडळ, महिला बचत गट, किटी पार्टी ग्रुप असे महिलांचे अनेक वेगवेगळे ग्रुप समुहाने जाऊन सिनेमा बघण्याचा आनंद लूटत असताना दिसून येत आहेत. सिनेमा रिलीज झाल्यानंतर देखील अनेक कलाकारांची सिनेमा सोबतची नाळ जोडली गेली आहे.

या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय,उत्कृष्ट कथानक,सुरेल गाणी अन्  दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे या चित्रपटाने मोठी मजल मारली आहे. तर अनेक दिवसांनी मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आल्याचं पाहायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube