राज ठाकरेंचा निकटवर्तीय चुक्कलला अटक; अक्षय कुमाराच्या बहिणीचा बनावट कागदपत्राने फ्लॅट हडपला ?

Ganesh Chukkal: चुक्कल यांचा ब्राइस इन्फ्रास्ट्रक्चरसोबतचा संबंध 2023 मध्ये अंतर्गत वादानंतर संपुष्टात आला होता. मात्र, कथित बनावट कागदपत्रे 2022 मध्ये तयार करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Ganesh Chukkal

Ganesh Chukkal Arrested : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय गणेश चुक्कलला (Ganesh Chukkal ) एक बनावट कागदपत्रा प्रकरणात अटक करण्यात आलीय. अभिनेता अक्षय कुमारची बहीण अलका भाटिया हिरानंदानी यांच्या स्वाक्षरीची कथित बनावट प्रत तयार करत पवईतील हिरानंदानी इस्टेटमधील आलिशान फ्लॅटसाठी बनावट 30 वर्षांचा लीज करार तयार केल्याच्या आरोप चुक्कल याच्यावर आहे. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. चुक्कल हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभागप्रमुख आहे.

MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात; फडणवीसांना थेट फोन, म्हणाले- ‘संवादातून मार्ग काढा’

गणेश चुक्कल हा ब्राइस इन्फ्रास्ट्रक्चरचे माजी संचालक आहे. त्याने अलका भाटिया हिरानंदानी तसेच मेलोरिना हॉस्पिलिटी (Melronia Hospitality Private Limited) कंपनीच्या इतर संचालकांच्या कथित बनावट स्वाक्षऱ्या करून लीज डीड तयार केला. हा कथित बनावट करार पवईतील हिरानंदानी इस्टेटमधील ओडिनोओ इमारतीतील फ्लॅट क्रमांक 3505 संदर्भात आहे. हा प्लॅट अलका भाटिया यांच्या नावावर आहे. कंपनीच्या संचालकांनी चुक्कल यांच्याविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ज्ञानेश कुमारांची 20 वर्षांपूर्वीची फाईल उघडली; भ्रष्टाचार, गुन्हेगारी गैरवर्तनाचे आरोप, कोणता सरकारकडून चौकशीचे आदेश ?

3 वर्षांचा करार 30 वर्षांचा केल्याचा आरोप
चुक्कल यांचा ब्राइस इन्फ्रास्ट्रक्चरसोबतचा संबंध 2023 मध्ये अंतर्गत वादानंतर संपुष्टात आला होता. मात्र, कथित बनावट कागदपत्रे 2022 मध्ये तयार करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यावेळी चुक्कल हे कंपनीशी संबंधित होते. या प्रकरणात चुक्कल यांना इतर काही व्यक्तींनी मदत केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपासादरम्यान पोलिसांकडून फोन रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. कथितरित्या या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मनसे पदाधिकाऱ्याच्या अटकेने राजकीय वर्तुळात चर्चा
गणेश चुक्कल हे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेचे विभागप्रमुख आहे. तसेच राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आहे. त्यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावर मनसेकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

follow us