Sheikh Mohammed Baba Temple: हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारे श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज मंदिर गेल्या काही वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या धार्मिक स्थळाच्या जीर्णोद्धार आणि वार्षिक यात्रोत्सवाच्या आयोजनावरून स्थानिक यात्रा समिती आणि मंदिर ट्रस्ट यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
संत शेख महंमद महाराज (Sheikh Mohammed Baba Temple) यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराला अडथळा आणल्याने गुरुवारी (ता.17) श्रीगोंदा बसस्थानक ते श्रीगोंदा तहसील कार्यालयावर आध्यात्मिक मार्गाने हजारो टाळकरी, भजनी, वारकरी यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. तसेच गाव बंद ठेवून धरणे आंदोलन करण्यात आले. यात्रा समितीने मंदिराच्या विकासासाठी आक्रमक पवित्रा घेत 17 एप्रिलपासून श्रीगोंदा शहर बेमुदत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या वादामुळे प्रशासनाचीही कोंडी झाली असून, सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या या स्थळाभोवती तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमका वाद काय?
जाणून घ्या मंदिराच्या जीर्णोद्धार आणि यात्रा आयोजनावरून गेल्या काही वर्षांपासून यात्रा समिती आणि मंदिर ट्रस्ट यांच्यात तणाव आहे. यात्रा समितीला मंदिर परिसराचा विकास आपल्या ताब्यात करायचा आहे, तर संतांचे वंशज आणि ट्रस्ट मंदिराच्या जागेवर आपला कायदेशीर हक्क सांगतात. हा वाद आता न्यायालयात पोहोचला असून, दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका ठामपणे मांडली आहे.
टीम इंडिया बदलणार, अभिषेक-नितीश रेड्डीबाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय?
सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह नावावरून श्रीगोंद्यात वाद पेटला आहे. आज यासंदर्भात श्रीगोंदा शहरातून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा थेट तहसील कार्यालयासमोर नेऊन त्याठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. सोबतच जोपर्यंत मंदिर जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत श्रीगोंदा बेमुदत बंदचे आवाहन करण्यात आले असून ग्रामस्थांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.