‘कितीही बैठका घ्या, पण मोदींना..,’; आमदार संजय गायकवाडांचा ‘इंडिया’वर निशाणा

कितीही बैठका घेतल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फाईट देण्याची ताकद कोणामध्येच नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यात आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. संजय राऊतांच्या टीकेनंतरच संजय गायकवाडांनी(Sanjay Gaikwad) संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. […]

Sanjay Gaikawad

Sanjay Gaikawad

कितीही बैठका घेतल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फाईट देण्याची ताकद कोणामध्येच नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यात आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येत आहे. संजय राऊतांच्या टीकेनंतरच संजय गायकवाडांनी(Sanjay Gaikwad) संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

आमदार संजय गायकवाड म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कोण फोन करणार आहे? ही घाण आम्हाला नको आहे, संजय राऊत ज्या पक्षासोबत जातात तो पक्ष संपतो, अशी टीकाही संजय गायकवाड यांनी केली आहे.

आशिया चषकात शून्यावर बाद न होता सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, सचिन तेंडुलकर नंबर वन

यावेळी बोलताना त्यांनी एनडीए इंडिया आघाडीची मुंबईत होत असलेल्या बैठकीवरही जोरदार टीका केली आहे. यांनी कितीही बैठका घेतल्या तरी मोदींना टक्कर देणारा चेहरा एनडीएच्या काल्पनिक इंडियाकडे नसल्याचं संजय गायकवाड म्हणाले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘रासप’ही आखाड्यात; महादेव जानकरांनी फुंकलं रणशिंग!

भाजपला पराभूत करण्यासाठी देशातल्या 28 विरोधी पक्षांनी वज्रमूठ तयार केली असून या आघाडीला इंडिया असं नाव देण्यात आलं आहे. आत्तापर्यंत विरोधी पक्षांच्या दोन बैठका पार पडल्या असून उद्या मुंबईत तिसरी बैठक पार पडणार आहे.

या बैठकीवरुन संजय शिरसाठ यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. दरम्यान, संजय राऊत यांना सुद्धा दिल्लीतून भाजप सोबत येण्यासाठी फोन आल्याचा दावा संजय राऊत यांनी केल्यानंतर आमदार गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

Exit mobile version