Shinde orders MCOCA action; Tukaram Mundhe briefs on crackdown: राज्यात दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात आता अधिक कठोर कारवाई करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ अंतर्गत 2026-27 या वर्षासाठी विभागनिहाय निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांचा आढावा घेण्यासाठी काल (11 ऑगस्ट) सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले.
भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान मुलांकडून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे दुधात भेसळ करणे, बनावट पनीर तयार करणे किंवा इतर खाद्यपदार्थांमध्ये घातक पदार्थ मिसळणे हा गंभीर प्रकार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
भेसळखोरांवर मकोकाची कारवाई
दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची सूचना शिंदे यांनी केली. अशा प्रकरणांमध्ये अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याबाबतही त्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी; ठाकरेंना मिळणार ‘सर्वोच्च’ दिलासा? Live
भेसळ करणाऱ्यांवर केवळ कारवाई करून थांबता कामा नये, तर न्यायालयीन प्रक्रियेतही संबंधित प्रकरणे ठोसपणे टिकली पाहिजेत, असे शिंदे यांनी बैठकीत सांगितले. खटल्यांच्या सुनावणीदरम्यान कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये, यासाठी अनुभवी आणि ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विशेष कायदेशीर पथकाची स्थापना
भेसळ प्रकरणांमध्ये दाखल होणारे गुन्हे न्यायालयात टिकण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर यंत्रणा उभारण्याचा निर्णयही या बैठकीत पुढे आला. नामवंत विधीतज्ज्ञांचा समावेश असलेले विशेष लीगल टीम तातडीने तयार करण्यात यावे, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली.
‘हिरो की हैवान?’ प्रश्न पडणार; अक्षय कुमार आणि सैफ अली खानच्या ‘हैवान’चा थरारक टीझर रिलीज
या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) उपस्थित होते. विभागाकडून राज्यभर सुरू असलेल्या कारवाईची माहिती यावेळी सादर करण्यात आली.
यापूर्वीही मकोकाची घोषणा, मात्र अंमलबजावणीचा प्रश्न
खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी मकोका लावण्याची भूमिका सरकारकडून यापूर्वीही मांडण्यात आली आहे. दूधातील भेसळ, बनावट पनीर आणि दुग्धजन्य पदार्थांबरोबरच प्रतिबंधित गुटख्याची विक्री, गोवंशाची बेकायदा वाहतूक आणि अवैध कत्तलीसारख्या प्रकरणांमध्येही मकोका लागू करण्याच्या घोषणा यापूर्वी करण्यात आल्या आहेत.
Video : चर्चा तर करा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन; वेळ सांगत शाहांचं विरोधकांना खुलं आव्हान
मात्र, अशा घोषणांनंतरही राज्यात भेसळयुक्त आणि बनावट खाद्यपदार्थांची प्रकरणे समोर येत आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाया केल्या जात असल्या तरी पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी प्रत्यक्षात किती जणांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली, याची स्पष्ट अधिकृत आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.
त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या या निर्देशांनंतर भेसळखोरांविरोधातील कारवाई प्रत्यक्षात किती कठोर होते आणि मकोका अंतर्गत किती प्रकरणे दाखल होतात, याकडे लक्ष लागले आहे.
