Download App

CM शिंदेंच्या उपस्थितीत शिवजन्मसोहळा साजरा; छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला परिसर, शिवभक्तांची अलोट गर्दी

  • Written By: Last Updated:

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज (सोमवार, 19 फेब्रुवारी) ला अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांची ३९४ वी जयंती आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना राजांच्या जन्मस्थळी वेगळाच माहोल पाहायला मिळत आहेत. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंद (Eknath Shind) यांच्या उपस्थित हा शिवजयंती सोहळा साजरा झाला आहे.

निवडणूक आयोगाविरुध्दच्या याचिकेवर आज SCमध्ये सुनावणी, पक्ष अन् चिन्ह शरद पवार गटाला मिळणार? 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा झाला आहे. या उत्सवानिमित्त शिवजन्मस्थान, शिवकुंज, शिवदेवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गडाचे दरवाजे फुलांच्या माळांनी सजवलेले आहेत. सकाळी शिवाई देवीची शासकीय महापूजा करण्यात आली.

मोठी उलथापालथ! SC च्या सुनावणीपूर्वीच चंदीगडच्या महापौरांचा राजीनामा, 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश 

सकाळी सहा वाजता शिवनेरी किल्ल्यावर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ पंकज देशमुख यांच्या हस्ते शिवाई देवीचा अभिषेक करण्यात आला. त्यांतर शिवाई देवी मंदिरापासून ते शिव जन्मस्थानापर्यंत पालखी मिरवणूक निघाली. सकाळी ८ वाजता मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरने शिवनेरी किल्ल्यावर आगमन झाले. त्यानंतर त्यानंतर पाळणा गाऊन हा सोहळा पार पडला आहे. त्यानंतर पोलीस मानवंदना आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाला आहे.

दरम्यान, शिवजयंतीसाठी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवभक्त शिवनेरी गडावर दाखल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषाने संपूर्ण गडावर जयघोष होत आहे.

दरम्यान, डाच्या पायथ्याशी शिवभक्तांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली. उत्सवासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.

शिवनेरीचं ऐतिहासिक महत्व
1595 मध्ये, शिवबांचे आजोबा मालोजी भोसले यांची अहमदनगरच्या सुलतान बहादूर निजाम शाहच्या दरबारात मुख्य सरदार म्हणून नियुक्ती झाली. निजामाननेच त्यांना शिवनेरी आणि चाकणचा प्रांत जहागीर म्हणून दिला. याच शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यावेळची सुरक्षा आणि राजकीय परिस्थितीमुळे जिजाऊंना अवघ्या दोन वर्षांत बाळराजांसह हा गड सोडावा लागला.

1673 मध्ये महाराजांनी हा किल्ला पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण, प्रयत्न फसला. पुढे हा किल्ला राजांच्या हयातीत मुघलांच्या ताब्यात राहिला. अखेर 40 वर्षांनी हा किल्ला मराठा साम्राज्यात परत आला. शाहू महाराजांच्या काळात हाच किल्ला 1716 मध्ये पेशव्यांच्या ताब्यात देण्यात आला.

follow us