छत्रपतींचा अवमान आता गुन्हा ठरणार! मंत्री अमित शाहा रायगडावरुन घोषणा करणार

Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांचा (Chatrapati Shivaji Maharaj) अवमान करणं आता गुन्हा ठरणार असून स्वतंत्र कायदा तयार करण्यात येणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडावरुन घोषणा करणार असल्याची माहिती भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
पुणे गर्भवती मृत्यूची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत
छत्रपती शिवाजी महाराजांची १२ एप्रिल रोजी पुण्यतिथी आहे. यानिमित्त रायगडावर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही येणार आहेत. तसंच लोकांची अशी मागणी आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजधानी होती, रायगड. तिथून या कायद्यासह सर्व बाबींची घोषणा व्हावी, त्याला एक आगळंवेगळं महत्व प्राप्त होईल.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकदा अवमानकारक विधान करण्यात आली आहेत. यामध्ये भाजप नेता श्रीपाद छिंदम, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, अभिनेता राहुल सोलापूरकर आणि आता प्रशांत कोरटकर यांचा समावेश आहे.