Download App

राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी; मुख्यमंत्री फडणवीस अन् आदित्य ठाकरेंची हॉटेलमध्ये भेट?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये भेटल्याची माहिती समोर आली आहे.

  • Written By: Last Updated:

Aditya Thackeray and CM Devendra Fadnavis Meet : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये एकत्र भेटल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. (Fadnavis ) त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकारणात नवं समीकरण तर उदयास येणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुंटूंब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटी गाठी वाढल्या आहेत. त्यामुळे आता हे दोन्ही नेते एकत्र असल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच, या दोघांमध्ये भेट झाली नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपताच दानवे मवाळ?, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबद्दल काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली होती. उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती.

ऑफर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने झाल्यात आणि त्या गोष्टी खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती. या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी, हिंदी सक्ती हवीच कशाला या लेखाचा संग्रह प्राप्त झाला, ठाकरेंनी काल दिलेलं पुस्कक मी वाचलं. कुणी कुणाला भेटलं म्हणजे युतीसाठी भेटलं असं होतं नाही असं स्पष्टीकरण दिलं होतं.

follow us