Download App

अजित पवार येऊ अथवा शरद पवार… तनपुरे कारखान्यावर कर्डिले स्पष्टच बोलले

Shivaji Kardile ON Tanpure Factory : राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेच्या

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Shivaji Kardile On Tanpure Factory : जिल्हा सहकारी बँकेच्या (District Cooperative Bank) बैठीकीत मोठा निर्णय घेत राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखाना (Tanpure Cooperative Sugar Factory) भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर संपूर्ण तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हा कारखाना चालवायला घेणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.

तर आता या प्रकरणात जिल्हा बँकेचे अध्यक्ष  शिवाजीराव कर्डिले (Shivaji Kardile) यांनी भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना शिवाजीराव कर्डिले म्हणाले, काही दिवसापूर्वी आम्ही कारखाना चालविण्याबाबत निविदा काढले होते मात्र त्यासाठी फक्त एकच निविदा आल्याने आम्ही आता पुन्हा एकदा निविदा काढणार आहे.

तर काही दिवसांपासून तनपुरे सहकारी साखर कारखाना चालविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) घेणार आहेत अशी चर्चा आहे. मात्र माझा असं मत आहे की तो कारखाना चालला पाहिजे शेतकऱ्यांना ऊस गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसे आले पाहिजे तसेच बाजारपेठ देखील फुलली पाहिजे.

त्यामुळे जर अजित पवार किंवा देशाचे नेते शरद पवार किंवा जयंत पाटील किंवा ज्यांनी या कारखान्याचे वाटोळे केले तनपुरे यांनी देखील टेंडर भरले तर आम्ही ज्यांच्याकडून सर्वात जास्त निविदा भरली रक्कम येईल त्याच्या बोर्डाच्या बैठकीत विचार करून एकमताने निर्णय घेऊन आणि त्यानंतर कारखाना चालवण्यासाठी देण्यात येईल असेही यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले म्हणाले.

ओबीसी बोगस आरक्षण खातायंत, हाकेंचा दोष नाही तर ‘येवल्या’वाल्याचा; जरांगेंनी धू-धू धुतलं…

तसेच जिल्हा बँकेने 134 कोटी रुपयांचे कर्ज या कारखान्याला दिले आहे. आम्ही दिलेल्या कर्जाची परत वसुली व्हावी हाच आमचा उद्देश आहे. तसेच ज्या कामगारांचे थकीत पगार आहेत त्यांना त्यांचे पगार मिळावे यासाठी आम्ही कर्ज दिला आहे. कारखान्यात तब्बल सव्वाशे कोटी रुपयांची थकीत पगार आहे असं देखील यावेळी कर्डिले म्हणाले.

Rockstar DSP देणार चाहत्यांना सरप्राईज, केली मोठी घोषणा

follow us

वेब स्टोरीज