Download App

Shivsena Advertisement : शिवसेनेने कालची चूक सुधारली! फडणवीस अन् बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापून सारवासारव

Image Credit: LetsUpp

Shivsena Advertisement : शिवसेनेकडून काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित केलेल्या जाहिरातीवरुन राजकारण ढवळून निघालं होतं. कालच्या जाहिरातीवरुन भाजपमध्ये नाराजी तर विरोधकांकडून टीका-टिपण्या केल्या जात असल्याचं दिसून आलं होतं. जाहिरातबाजीवरुन शेकल्यानंतर आता आज शिवसेनेकडून सारवासारव करण्यात आलीय. आज प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, पतंप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो प्रकाशित करण्यात आले आहेत. एकंदरीत जाहिरातबाजीचं प्रकरण तापल्यानंतर फुंकर म्हणून शिवसेनेने आजची जाहिरात दिल्याची चर्चा आहे.

सीएम शिंदेंच्या ट्विटवर औरंगाबादचा उल्लेख; रोहित पवारांनी स्क्रीनशॉट शेअर करत सुनावले

आजच्या जाहिरातीमध्ये भाजप-शिवसेना युतीला 49.3 टक्के जनतेला कौल असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. तसेच विरोधकांच्या टक्केवारीत फूट करुन आकडेवारी सादर आलीय. राज्यात प्रमुख विरोधक 26.8 टक्के असून इतर 23.9 टक्के असल्याचा दावा करण्यात आला आहे.

एका सर्वेनूसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच महाराष्ट्रात अव्वलस्थान मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. काल यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या.’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या मथळ्याखाली सर्वेक्षणाची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. जाहिरातीमधून राज्यात देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांच्यात एकनाथ शिंदेंच अव्वल असल्याचं दर्शवण्यात आलं होतं.

जगभरातील मुस्लिमांना खास गिफ्ट देण्यासाठी ड्रॅगननं आखल खास मिशन

काल ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर भाजपचमध्ये धूसफुस सुरु असल्याचं दिसून येत होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौराही रद्द केला होता. त्यामुळे भाजपला जाहिरातीतून दुय्यम स्थान दिल्याचं बोललं जात होतं. तर दुसरकीडे विरोधकांकडून जाहिरातीवरुन एकनाथ शिंदेंना चांगलंच धारेवर धरलं जात होतं.

कालच्या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी 26.1 टक्के जनतेची शिंदेना तर 23.2 टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे भाजपमधून नाराजीचा सूर दिसून येत होता. कालची चूक सुधारुन आज अखेर शिवसेनेकडून सारवासारव करण्यात आलीय. आज पुन्हा दुसरी जाहिरात प्रसिद्ध करुन फुंकर मारण्यात आलीय.

Gunratna Sadavarte यांची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले… ‘महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेसोबत…’

कालच्या जाहिरातीवरुन शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी शब्द फिरवले होते. काल जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच्याशी शिवसेनेचा संबंध नाही कोणत्यातरी हितचिंतकाने जाहिरात दिली असेल, असं ते म्हणाले होते.

दरम्यान, जाहिरातबाजीवरुन बाळासाहेब ठाकरेंबाबत शिंदेंचं प्रेम हे केवळ ढोंग आहे, अशी टीका सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आली होती.

Tags

follow us

वेब स्टोरीज