जगभरातील मुस्लिमांना खास गिफ्ट देण्यासाठी ड्रॅगननं आखल खास मिशन

  • Written By: Published:
जगभरातील मुस्लिमांना खास गिफ्ट देण्यासाठी ड्रॅगननं आखल खास मिशन

चीन अर्थात ड्रॅगन नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. जगभरातून चीनवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवल्यानंतरही चीन काही केल्या सुधारण्याचे नाव घेत नाहीये. त्यानंतर आता चीननं पुन्हा एका मिशनवर काम करण्यास सुरूवात केली असून, यासाठी चीनकडून विशेष पुढाकार घेतला जात आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष अनेक दशके जुना असून, या वादाचा मूळ कारण हे अल-अक्सा मशीद आहे. जेरुसलेममध्ये हे एक धार्मिक स्थळ आहे, ज्यावर जगभरातील मुस्लिमांची श्रद्धा आहे. दुसरीकडे, ज्यूंसाठी ते त्यांच्या अस्तित्वाचे सर्वात मोठे प्रतीक आहे. मात्र, या जागेवरून दोन्ही देशांत अनेक वर्षांपासूनचे जुने वैर आहे. दोन्ही देशातील हा तणाव संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेसह जगातील सर्वच देश प्रयत्न करत आहेत, मात्र आजतागायत येथे शांतता प्रस्थापित करण्यात यश आलेले नाही. त्यात आता चीनने हा वाद शमवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मोठी बातमी : खंडाळा घाटात भीषण अग्नितांडव; चौघांचा होरपळून मृत्यू तर, तिघे जखमी

या वादावर तोडगा काढण्यासाठी चीन पॅलेस्टाईनशी सातत्याने चर्चा करत असून, विशेष बाब म्हणजे पॅलेस्टाईनही चीनकडून करण्यात येणाऱ्या चर्चेला खुल्या दिलाने स्वीकारत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर दाखल असून, अब्बास यांचा हा पाचवा चीन दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान, अब्बास चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत पॅलेस्टाईनच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यापूर्वी चीननं अब्बास हे आपले जुने मित्र असल्याचे म्हणत पॅलेस्टाईन लोकांच्या हक्कांचे चीन नेहमीच समर्थन करत असल्याचे म्हटले आहे.

मोदी-शाह-नड्डांचे दौरे वाढले; भुजबळांनी बोटीची स्टोरी सुनावत भाजपला दिले आव्हान

पॅलेस्टाईच्या पाठिंब्यामागे काय कारण?
चीन हा फसवणूक करणारा देश म्हणून ओळखला जातो. चीनच्या विस्तारवादी धोरणाला भारतही कंटाळला आहे. यासोबतच चीनने आर्थिक आघाडीवर जगाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली असून, आता चीनसमोर जागतिक नेता बनण्याचे सर्वात मोठे आव्हान हे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे असून, अमेरिकेला बाजूला करण्यासाठी चीन अशाप्रकारे पावले उचलत असल्याचे मानले जात आहे.

लोकसभेपूर्वी PM मोदींचा बेरोजगारीवर सर्जिकल स्ट्राईक: 70 हजार तरुणांना नोकरीतील नियुक्तीपत्र

सर्व आखाती देशांसाठी अल अक्सा मशीद आणि पॅलेस्टाईनची शांतता हा नेहमीच मोठा मुद्दा राहिला आहे. अशा परिस्थितीत चीनने पॅलेस्टाईनच्या रूपाने असा आंतरराष्ट्रीय मुद्दा उपस्थित केला आहे, ज्यावर अरब जगासह संपूर्ण जगाच्या मुस्लिमांच्या नजरा खिळल्या आहेत. उईगर मुस्लिमांच्या दडपशाहीसाठी चीन जगभर कुप्रसिद्ध आहे. पण अशा प्रयत्नांतून चीनला आपली प्रतिमा सुधारण्याची संधी आहे. तसेच आखाती जगतावर पकड मजबूत करून पाश्चिमात्य राष्ट्रांसमोर अधिक ठामपणे उभे ठाकण्याचा चीनचा या माध्यामातून प्रयत्न आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात शेवटची चर्चा 2014 मध्ये झाली होती आणि या चर्चा अमेरिकेच्या प्रयत्नांचे परिणाम होत्या. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून चीनने पुढाकार घेतला असून, चीनचे प्रयत्न इस्रायल-पॅलेस्टाईन तणाव दूर करू शकतील की नाही हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Vasudev community : आता वासुदेव फारसे काही दिसत नाही? ऐका…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube