Shivsena CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार व 10 अपक्ष आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. गेल्या वर्षाभरात सत्तासंघर्षामुळे हे सरकार कायम चर्चेत राहिले. आधी सुरत त्यानंतर गुवाहाटी आणि मग गोव्यामार्गे मुंबई असा सत्तासंघर्षाचा प्रवास आजही नागरिकांच्या चांगलाच लक्षात आहे. या सरकारच्या वर्षपुर्तीच्या निमित्ताने शिंदे गटाकडून खास व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ( One Year Complete Eknath Shinde Goverment )
शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेती सर्व सोशल मीडिया खाती ठाकरे गटाने आपल्याकडे ठेवली होती. त्यामुळे शिंदे गटाकडे अधिकृत सोशल मीडिया खात नव्हतं. त्यानंतर शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने शिंदे गटाने आपलं अधिकृत सोशल मीडिया खातं लाँच केलं. हा व्हिडीओ याच सोशल मीडिया अकाऊंटवरुन लाँच करण्यात आला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती! अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर ‘शिंदेशाही’ला झाली होती सुरुवात…
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, प्रखर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना..असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच आशीर्वाद शिवछत्रपतींचे, एक वर्ष सुराज्याचे.., असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये गेल्या वर्षभरात कोण-कोणत्या घटना घडल्या त्याचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गेल्या वर्षभरात कसे काम केलं, यासह त्यांच्यावर झालेली टीका, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील वाक्य याचा आवाजदेखील या व्हिडीओला देण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी
प्रखर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी
सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना..आशीर्वाद शिवछत्रपतींचे
एक वर्ष सुराज्याचे..#Shivsena #VarshSurajyache #varshpurti pic.twitter.com/cYcJzEZRkj— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) June 30, 2023
मेळावा रद्द झाला पण पवारांचं ‘नगर’वर लक्ष कायम; विखे-शिंदेंना शह देण्यासाठी रविवारी मैदानात
संघर्ष होता प्रत्येक वाटेवर, प्रत्येक वाट होती रोखलेली, वार होते कडवट, जिव्हारी आणि तेवढेच विखारी. पण एकाकी लढाई होती, देव, देश आणि धर्मासाठी म्हणून फडकला भगवा वादळातही. नेतृत्वाने कवेत घेतला अवघा आसमंत संपवले दरबारी राजकारण आणि गहिवरुन गेले जनमन, असे या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.