Download App

बहुमत असताना अजितदादांना का घेतले? फडणवीसांनी न्याय दिलाच पाहिजे; शिंदे गटाचे आमदार भडकले

Sanjay Shirsat NCP Political Crisis : राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दुसरीकडे खातेवाटप आणि अजित पवारांची एन्ट्री यावर मात्र शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या तशा प्रतिक्रिया देखील येत आहेत आता शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे की, बहुमत असताना अजितदादांना का घेतले? ( Shivsena MLA Sanjay Shirsat Aggressive on Ajit Pawar enter in Shinde-Fadanvis Government )

Maharashtra politics; अजित पवारांनी 24 तास आधीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ का घेतली?

काय म्हणाले संजय शिरसाट?
आम्हाला बहुमताची गरज नव्हती. मग अजित पवारांना का घेतलं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आमचे कार्यकर्ते आम्हाला यावर प्रश्न विचाारत आहेत. त्याचबरोबर हे मंत्रिमंडळ चालणार कसं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी हे सगळं प्लॅन करून केले आहे. अजित पवारांसोबत पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर आता दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यामध्ये शिंदेंचे आणि भाजपचे मंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या आमदारांचं काय होणार हे या आठवड्यात कळेल.

काँग्रेसची आंबेडकरांना साद! थेट दिल्लीतून मोठ्या नेत्याचा फोन; नव्या आघाडीची तयारी?

त्याचबरोबर शिरसाटअसं देखील म्हणाले की, आम्ही एकदम सगळच सोडायच असेल तर सत्ता कशाला हवी? त्यामुळे आम्ही आशावादी आहोत की, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यांना आम्हाला न्याय द्यावाच लागेल. त्याशिवाय जमणार नाही. राष्ट्रवादी सत्तेत आली तरी आम्ही निराश व्हायचं कारण नाही. तसेच आमच्या अधिकारांवर गदा येणार नाही अशी मला आपेक्षा आहे.

सत्तेत येण्याची काही कारण असतात. जसे अजित पवार काम करण्यासाठी आले आहेत. तसेच आम्हाला देखील काम करायचंय. आम्ही काही लोकसभा आणि विधानसभेसाठी खिरापत वाटत फिरतोय असं नाही. अशी नाराजी सुरातील प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. नवीन उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार या बैठकीत उपस्थित होते. यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच अजित पवार हे आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेना व भाजपच्या सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर मंत्रिमंडळाची ही पहिली बैठक पार पडली.

Tags

follow us