Download App

जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का; बालेकिल्ल्याला अजितदादांचे खिंडार

Jitendra Aawahd : ठाणे हा राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा बाले किल्ला मानला जातो. मात्र आता ठाण्यामधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच (NCP) त्यांची साथ सोडली आहे. की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार ( Ajit Pawar) यांना पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. ठाण्यामधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते अजितदादा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी दादांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमले होते. यावेळी त्यांनी अजित दादांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्याला अजितदादांनी खिंडार पाडले असल्याचं बोललं जात आहे. ( Shocked to Jitendra Aawahd by Thane NCP activists supports to Ajit Pawar )

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मुंबईत झालेल्या पहिल्याच सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज आव्हाड यांनी बंड केलेल्या आमदारांना भावनिक आवाहन केलं होत. मी पक्षातून बाहेर पडतो. तुम्ही परत या, असं आव्हाड म्हणाले होते.

अजितदादांना ठाकरेंनी दाखवला आरसा, म्हणाले, कालपर्यंत मोदींना शिव्या देत होते…

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP)बऱ्या, वाईट काळामध्ये जयंत पाटील (Jayant patil)आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad)यांनी भक्कमपणाने स्वतःच्या करिअरचा किंचितही विचार केला नाही. पक्ष, विचारधारा, कार्यक्रम याच्यासाठी पाहिजे ते देण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे मला त्यांचा अभिमान असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी स्पष्टपणे सांगितले. ते नाशिक जिल्ह्यातील मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या बालेकिल्ल्यात येवल्यात बोलत होते.

Tags

follow us