Ketan Agrawal murder case, new information: पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना न्यायालयाने काल (16 जुलै) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वडगाव मावळ न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हि सुनावणी घेण्यात आली. तसेच केतन अग्रवाल हत्येच्या तपासात पुणे पोलिसांना एक धक्कादायक माहीती मिळाली.
चेतन आणि सियाने पहिल्यांदा केतनची हत्या करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलरला शोधले होते. ते दोघे किलरला एका कॅफेमध्ये भेटलेही होते. त्यांच्या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. तोच किलर आता या हत्याप्रकरणात मुख्य साक्षीदार ठरणार असल्याची शक्यता आहे. केतनची माहीती घेतल्यानंतर किलरने त्याची हत्या करण्यास नकार दिला होता. ऐनवेळी किलरने माघार घेतल्यामुळे सिया आणि चेतननेच केतनच्या हत्येचा कट रचला.
केतन आणि सियाचं लग्न ठरल्यानंतर तिने केतनला विष देऊन मारण्याचा कट रचला होता पण विष मिळाले नाही, त्यामुळे तो डाव फसला. नंतर त्या दोघांनी केतनच्या हत्येची सुपारी देण्याचे ठरवले, त्यासाठी एक काँट्रॅक्ट किलरही शोधला, पण तो ऐनवेळी घाबरुन मागे हटला. आता पुढे काय करायचं? या विचारात असातना सियाने लोहगडावर एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची बातमी वाचली. मार्च 2025 रोजी 21 वर्षीय विधी शाखेच्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला होता. तेव्हा त्या मृत्यूची आत्महत्या म्हणून नोंद झाली होती. ती बातमी वाचताच सियाच्या डोक्यात एक कल्पना आली, ज्या ठिकाणावरुन त्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली त्याच ठिकाणावरुन केतनला ढकलून द्यायचे.
Saamna Movie : स्व.निळू फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सामना’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
केतनला ट्रेकिंगची आवड असल्यामुळे लोहगडावर केतन घेऊन जाणे सियाला सहज शक्य होते, तिथेच केतनला संपवायचा कट सियाने व चेतनने रचला आणि तसे केलेही. तसेच पोलिसांना दोघांच्या वेब हिस्ट्रीतून एक धक्कादायक माहिती मिळाली. पोलिसांना त्यांंच्या वेबहिस्ट्रीत दोन तासांचा एक जपानी व्हिडीओ सापडला. ज्यात “पोलिस चौकशी दरम्यान पोलिसांना कशी उत्तरं द्यायची, चौकशीत शांत कसं राहायचं, पोलिसांशी कसं वागायचं”, या प्रकारची माहिती होती. दरम्यान चौकशीदरम्यान पोलिसांना अजून कोणती माहिती मिळणार याकडे लक्ष असणार आहे.
SC/ST प्रवर्गातील धर्मांतरीत व्यक्तींना लाभ बंद? राज्य सरकारची समिती गठीत
