गुरुपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Dagdusheth Halwai Datta Mandir : गुरुपौर्णिमेनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक
Dagdusheth Halwai Datta Mandir : गुरुपौर्णिमेनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २९ जुलै या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक उपक्रम पार पडणार असून, भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या सत्रात धार्मिक विधी व पूजा-अर्चा, दुपारच्या सत्रात भजनाचा कार्यक्रम तसेच सायंकाळी भक्तिगीते व भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मंदिरात दिवसभर भाविकांसाठी प्रसाद वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. या उत्सवाच्या काळात विविध क्षेत्रांतील मान्यवर मंदिरास भेट देणार असून, भाविकांना आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.
याबाबत माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी सांगितले, “गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष आखणी करण्यात आली असून, सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.”
नैतिक जबाबदारी स्वीकारा अन् राजीनामा द्या; वांगचुक देशावर प्रेम करणारा, अभिनेते सयाजी शिंदे भडकले-
यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, खजिनदार ॲड. सूरज थोरात, विश्वस्त वर्षा थोरवे, विश्वस्त डॉ. पराग काळकर, विश्वस्त महेंद्रशेठ गाडवे, उत्सव प्रमुख नितीन पंडित तसेच उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर उपस्थित होते.