Download App

…म्हणून तृतीयपंथीयांनी पेटत्या चितेसमोर मांडली अघोरी पूजा

पुणे : गेल्या काही दिवसांपासून अंधश्रध्देचे अनेक प्रकार देशासह राज्यातील काही भागांत याआधी समोर आलेले आहेत. याविरोधात अनेकांनी प्रयत्न करुन असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले आहेत. यासंदर्भात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने अनेकदा नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. अंधश्रध्देविरोधात जनजागृती करण्यासाठी प्रगतशील समाज कायम अग्रेसर राहीला आहे. अशातच पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात एका पेटत्या चिते समोर दोन तृतीयपंथीयांना अघोरी पूजा करताना पोलिसांना त्यांनी रंगेहाथ पकडले होते. ही घटना नूकतीच असून ही पूजा का आणि कशासाठी करत असल्याचं अखेर या आरोपींनी पोलिसांना सांगितलंय.

देशांतील अनेक भागांत स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याने धन मिळतं, चांगलं होतं, वेगैरे असा समज काही तांत्रिक-मात्रिकांकडून समाजात पसरवला जातो. याला बळी पडून सर्वसामान्य नागरिक त्यांच्या सांगण्याला बळी पडल्याच्या काही नवीन नाहीत. आता या घटनेत स्वत; तृतीयपंथीयच आपल्या स्वार्थासाठी पेटत्या चितेसमोर रात्री अपरात्री अघोरी पूजा करत असल्याचं समोर आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

ही घटना महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यात घडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील उच्चभ्रू भागातील वैकुंठ स्मशानभूमीत एका रात्री दोन तृतीयपंथीयांकडून पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा करण्यात आली होती. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांनी रंगेहाथ ताब्यात घेत दोन तृतीयपंथीयांना अटक केली.

लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी या दोन तृतीयपंथीयांची नावं असून त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिलीय. अटक करण्यात आलेल्या दोन तृतीयपंथीयांपैकी एकाच्या आईला कॅन्सर आजार जडलेला होता. रात्री अपरात्री स्मशानभूमीत पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा केल्यास आईचा कॅन्सर आजार बरा होईल, या समजातून त्या दोघांनी त्या रात्री वैकुंठ स्मशानभूमीतील पेटत्या चितेसमोर ठरल्याप्रमाणे अघोरी पूजा मांडण्याचा बेत आखला.

त्यानूसार या दोघांनीही तशी तयारी केली. आणि ठरललेल्या दिवशी, त्या वेळेत दोघांनी स्मशानभूमी गाठली. सोबत असलेल्या आपल्याला पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची मांडणी करुन त्यांनी आपल्या अघोरी कृत्याला सुरुवात केलीय. ही अघोरी पूजा मध्यान्हपर्यंत आली होती. अखेर त्याचवेळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघा तृतीयपंथीयांच्या अघोरी पूजेचं भांड फुटलं, अशी कबुली या दोघा तृतीयपंथीयांनी पोलिसांना दिलीय.

दरम्यान, पुण्यासारख्या शहरात अशी घटना घडल्याने राज्यभरात हा विषय चर्चेचा बनला असून अंधश्रद्धेला आजही बळी पडणाऱ्यांची संख्या दिसून येत असल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले आहे. या घटनेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून अशा समजांवर विश्वास ठेऊ नका, असं सातत्याने अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडून राज्यातील जनतेला आवाहन करण्यात येतंय.

Tags

follow us