Sindhudurg News : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लोक कोणत्या थराला जातील याची काही सीमा राहिलेली नाही. सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याची घटना येथे घडली आहे. (Sindhudurg) या घटनेमुळे संपूर्ण कोकणात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल केलाय. वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे (वय ३२) असं मृत तरुणाचं नाव आहे.
Rayat Education Institute: बाळ दुधासाठी अन् मी नोकरीसाठी; लेकरा-बाळांसह रयतचे शिक्षक रस्त्यावर
शॉक देऊन हत्या केली
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत उर्फ सागर हा कुडाळ तालुक्यातील माणगाव तळेवाडी येथील रहिवासी होता. त्याचा मृतदेह सासरवाड येथील एका नर्सरीत आढळून आला. आपल्या भावाची त्याच्या सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन हत्या केली असा आरोप मृत वसंत भगे याच्या भावाने केला आहे.
विद्युत तारांना करंट
यासंदर्भात त्याने पोलिसात तक्रार देखील दाखल केली. वेंगुर्ला पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, वसंत भगे याला त्याची पत्नी नुतन शंकर गावडे हिने सोमवारी रात्रीच्या सुमारास आडेली सातेरी गाळू येथे राहत्या घराजवळ बोलावून घेतलं. संशयित आरोपींनी वसंतला मारण्यासाठी त्यांच्या घराच्या कंपाऊंड भोवती विद्युत तारांचे जाळे तयार करून ठेवले. वसंत हा पत्नीच्या बोलवण्यावरून सासुरवाडीला गेला असता, त्याचा स्पर्श या विद्युत तारांना झाला. यामुळे शॉक लागून वसंतचा मृत्यू झाला असंही त्यांनी म्हटलं आहे.
मस्ती कराल, तर बायकोला फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू; नितेश राणेंची पोलिसांना धमकी
खुनाचा गुन्हा दाखल
वसंत आणि त्याची पत्नी नुतन यांच्यात नेहमी वाद व्हायचे, याच वादातून ही हत्या केली असावी, असा संशय मृत तरुणाच्या भावाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी वसंत भगे याची पत्नी नूतन, सासरे शंकर गावडे आणि सासू पार्वती शंकर गावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.