विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू; धक्कादायक घटनेने पुण्यात उडाली खळबळ

विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू; धक्कादायक घटनेने पुण्यात उडाली खळबळ

Pune Rains : पुणे शहर आणि जिल्ह्यात कालपासून धो धो पाऊस कोसळत (Pune Rains) आहे. या पावसामुळे शहराची दैना उडाली आहे. धरणाच्या पाणीपातळीत (Heavy Rainfall) झपाट्याने वाढ झाली आहे. आजही पुणेकरांना अतिमुसळधार पावसाचा सामना करावा (Maharashtra Rain) लागण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीतच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना ही घटना घडली. या घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Pune Car Accident : “हो, ते रक्त माझेच” कल्याणीनगर अपघातात अल्पवयीन मुलाच्या आईची कबुली

आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिजखालील अंडा भुर्जी स्टॉल येथे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने अंडा भुर्जी येथे काम करणारे तीन अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता निघाले होते. याचवेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. नंतर या तिघांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले होते. येथे उपचारांती डॉक्टरांनी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांना मयत घोषित केले. अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष 25 राहणार पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (वय 21 रा. पुलाची वाडी डेक्कन) आणि शिवा जिदबहादूर परिहार (वय १८ नेपाळी कामगार) अशी या तिघा जणांची नावे आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube