Download App

एकत्रित प्रवास, शेजारी जागा, जाहीर कौतुक : अजितदादांचा मंत्री सावलीसारखा पवार-सुळेंसोबत

Sharad Pawar : लातूर : आदरणीय पवार साहेब आमचं श्रद्धास्थान आहे. आपल्या सार्वजनिक आयुष्यामध्ये त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही. पण किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा अनेक संस्थांना पवार साहेबांनी सांगितलं की तिथे तुम्ही मदत केली पाहिजे, अनेक संस्थांना साहेबांनी त्या ठिकाणी मदत करण्याच्या सूचना केल्या आणि त्या मदतीवरतीच आज आपलं लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पुनर्रचित गाव मोठ्या चांगल्या पद्धतीने दिसत आहेत, असं म्हणतं राज्याचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले. (Sports Minister and rebel NCP MLA Sanjay Bansode praised NCP President Sharad Pawar)

आज (30 सप्टेंबर) लातूरमध्ये किल्लारी भुकंपग्रस्त कृती समितीच्यावतीने किल्लारी भुकंपाला 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजय बनसोडे बोलत होते.

अजितदादांसोबत वाद; जयंत पाटील भुजबळांच्या बाजूने; ‘ओबीसी’ मुद्दा ठरणार मनोमिनलाचा पॅटर्न?

दरम्यान, यावेळी संजय बनसोडे हे कार्यक्रमस्थळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत अगदी सावलीसारखे वावरताना दिसून आले. शरद पवार लातूरमध्ये येताच बनसोडे हे त्यांच्या ताफ्यासह पवार यांच्या ताफ्यात सामील झाले. पवार साहेबांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हंटलं होतं. स्मृतीस्तंभाला अभिवादन करताना पवार यांनीही बनसोडे यांना जवळ बोलावून घेत शेजारी उभे केले. त्यानंतर सभास्थळी जाताना बनसोडे यांनी सुप्रिया सुळे यांना आपल्या गाडीत जागा देत दोघांनी एकत्रित प्रवास केला. सभेतही बनसोडे यांनी शरद पवार यांचे अगदी तोंडभरुन कौतुक केले. त्यामुळे शिवसेनेतील बंडानंतर दिसणारे दृष्य राष्ट्रवादीतील बंडानंतर मात्र अगदी उलट दिसत आहे.

Ahmednagar Police : नगरमधील ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करा…थेट गृहमंत्र्यांना निवेदन

आमचे दैवत, आमचा देव, आमचा विठ्ठल एकच :

यापूर्वीही बनसोडे यांनी शरद पवार हेच आमचे दैवत, आमचा देव, आमचा विठ्ठल असल्याचं म्हंटलं होतं. गेल्या 50 वर्षात त्यांनी जे काम केलं, त्याच विचारला धरून आम्ही काम करत आहोत. आता परतीची दारं बंद केल्याच्या शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना देव कधी भक्तांना दूर करतो का? असा भावनिक सवाल त्यांनी उपस्थित विचारला होता. आम्ही त्यांच्या विचारांची पूजा करत काम करत राहणार, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला होता.

Tags

follow us

वेब स्टोरीज