संपदा हॉटेलला गेल्यानंतर ती रात्रभर प्रशांतला…, रुपाली चाकणकर यांची खळबळजनक माहिती?

अनफिट केलं जातं असं या डॉक्टर महिलेची तक्रार होती, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.

News Photo (79)

News Photo (79)

“आयसी कमिटी कार्यरत आहे. आयसी कमिटीकडे डॉक्टराची तक्रार नव्हती. (Beed) पोलीस आणि डॉक्टरांची एकमेकांविरोधातील तक्रार होती. चौकशी समितीने ही तक्रार निकाली काढली होती. पोलिसांची फिट अनफिटची तक्रार होती. पेशंटला उशिरा तपासण्याची पोलिसांची तक्रार होती, तर रात्रीच्यावेळी पेशंट आणले जातात. अनफिट केलं जातं असं या डॉक्टर महिलेची तक्रार होती” अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात त्या बोलत होत्या. “तीनवेळा बदली करण्यात येत होती. पण या डॉक्टर महिलेने फलटणच हवंय म्हणून सांगितलं होतं. पोलिसांनी सीडीआर काढला. गोपाल बदनेशी जानेवारी ते मार्चपर्यंत संवाद झाला. त्यानंतर संवाद नाही. प्रशांत बनकर सोबत संवाद होता. लक्ष्मीपूजनाला डॉक्टर महिला प्रशांत बनकरच्या घरी दिवाळीसाठी गेल्या. फोटो काढण्यावरून मोठा वाद झाला. भांडण झालं. त्यानंतर त्या घरातून निघाल्या” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

ती; आत्महत्या नाही तर हत्या, फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राहुल गांधींचा गंभीर आरोप

यामध्ये बनकरच्या वडिलांनी तिला समजावलं. त्यानंतर ती हॉटेलला गेली. तिने रात्रभर प्रशांतला मेसेज केले. त्याचा फोन बंद होता. मी आत्महत्या करेल वगैरे मेसेज केले होते. यापूर्वीही तू आत्महत्येची धमकी दिली होती, असं प्रशांतने तिला म्हटलं होतं” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. आज किंवा उद्या पीएम रिपोर्ट येईल. पण ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोपाळ बदने आणि संपदाचं लोकेशन एकत्र आहे का ते चेक केलं जाईल. लोकेशन सापडल्यावर कारवाई होईल. पोलीसही बदनेकडून माहिती घेत आहेत” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

पीएम रिपोर्ट आहे, सीडीआर आहे आणि फॉरेन्सिक अहवाल आहे. सीडीआर रिपोर्ट तिघांचा आहे. अजून कुणाचा आहे का बघण्यात येईल. डॉक्टरांची पहिली तक्रार आहे. पण जनरल डायरी करताना मे महिन्यातील रेकॉर्ड पोलिसांनी नमूद केलं आहे. महिला डॉक्टरची जुलैमधील आहे” असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. सध्या राज्यभरात महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे.

Exit mobile version