Download App

मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचं नाही; आईने आवाज ऐकला नाही, मुलाची अनाथाश्रमात आत्महत्या

तीन महिन्यांपूर्वी एका आठ वर्षांच्या मुलाला या अनाथाश्रमात आणण्यात आले होते. या मुलाच्या आईने दुसरं लग्न केलं होतं.

  • Written By: Last Updated:

Suicide in Orphanage : आईने दुसरा विवाह केल्यामुळे भाईंदर येथील अनाथाश्रमात ठेवण्यात आलेल्या लहानग्या मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाचं वय अवघे 8 वर्ष होत. (Mumbai Crime ) गेल्या काही महिन्यांपासून हा मुलगा भाईंदर परिसरातील एका अनाथाश्रमात राहत होता. हा मुलगा वारंवार आपल्या आईला, ‘मला इथून घरी घेऊन चल’, अशी विनवणी करत होता. परंतु, आईने त्याचे म्हणणे न ऐकल्याने या मुलाने रात्री सर्वजण झोपले असताना अनाथाश्रमातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेमुळे भाईंदर परिसरात खळबळ उडाली आहे.

नाद खुळा! जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी 900 एकराचं मैदान, 500 क्विंटल बुंदी, अन्8230

भाईंदरच्या उत्तन परिसरातील ‘केअरिंग हँड्स सेवा कुटीर’ अनाथाश्रमात हा प्रकार घडला. तीन महिन्यांपूर्वी एका आठ वर्षांच्या मुलाला या अनाथाश्रमात आणण्यात आले होते. या मुलाच्या आईने दुसरं लग्न केलं होतं. त्यामुळे तिने आपल्या मुलाला या अनाथाश्रमात ठेवले होतं. ती अधुनमधून मुलाला भेटण्यासाठी अनाथाश्रमात यायची. त्याला भेटून आई परत आपल्या नव्या घरी जायची. मात्र, प्रत्येकवेळी हा मुलगा आईला घरी घेऊन जाण्यासाठी मागे लागायचा. ‘मला तुझ्याजवळ राहायचे आहे, इथे राहायचे नाही ‘, असं सांगायचा आणि रडायचा.

गेल्या महिन्यातही या मुलाची आई अनाथाश्रमात आली होती. तेव्हादेखील या लहान मुलाने आईला घरी घेऊन चल, अशी गळ घातली. आई नेहमीप्रमाणे त्याला भेटून अनाथाश्रमातून आपल्या घरी निघून गेली. त्यामुळे हा लहान मुलगा प्रचंड निराश झाला होता. अखेर सोमवारी रात्री अनाथाश्रमातील सर्वजण झोपी गेल्यानंतर या मुलाने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. सकाळी उठल्यानंतर हा मुलगा कोणाच्या नजरेस पडला नाही. त्यामुळे शोधाशोध सुरु झाली, तेव्हा त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

 

follow us