महाराष्ट्र नक्की हे काय घडतय? अनाथाश्रमातील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकललं, साताऱ्यातील घटना
Satara Sex Racket : आधी कोलकाता आणि त्यानंतर बदलापूरमध्ये घडलेल्या घटनांनी देश हादरला. त्यानंतर अकोल्याची घटना अन् आता साताऱ्यातील आश्रमात मुलींना वेश्या व्यावसायात ढकलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Sex Racket) याप्रकरणी आश्रमचालक महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Satara) साताऱ्यातील कराडमधील टेंबू गावातील निराधार आश्रमात ही घटना घडली. याप्रकरणातील आरोपींना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे.
बदलापूर प्रकरण : अक्षय शिंदे गतीमंद? तीन लग्न झालीत का?; आई-वडिलांच्या दाव्याने नवा ट्विस्ट
सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली अनाथाश्रमात सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आश्रमचालक आणि त्या महिलेच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. कराड येथील टेंबू या भागात हा सर्व प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. एका युवतीच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला असून, अनेक मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
युवतीने वाचा फोडली
सातारा कराड येथील टेंबू गाव. या गावातील आई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित निराधार आश्रम या नावाखाली रेखा सकट नावाची महिला हे अनाथाश्रम चालवत होती. या अनाथ आश्रमामध्ये अनेक अनाथ मुलींची, अनाथ महिलांची भरती केली जात होती. मात्र, रेखा नावाच्या या महिलेकडून अनाथाश्रमामध्ये आलेल्या मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचं समोर आलं आहे. सातारा जिल्ह्यात राहणाऱ्या एका अनाथ युवतीनं या घटनेला वाचा फोडली. तिनं कराड पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराची सर्व माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रेखा सकट आणि तिचा प्रियकर वाल्मिकी माने या दोघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
Badlapur : गुन्हा लपवण्याचा यंत्रणेकडून प्रयत्न; बदलापूर घटनेवरुन राहुल गांधींचे टीकास्त्र
स्वत:ची सेवा करून
अनाथाश्रमात आलेल्या अनेक मुलींच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचं तक्रारदार मुलीकडून सांगितलं जात आहे. सध्या तरी ही तक्रारदार मुलगी पुढे आले आहे. मात्र, अद्याप इतर कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेलं नाही. या घटनेशी निगडीत असलेल्या अनेक व्हिडीओ, ऑडिओ क्लिप या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी रेखा सकट ही अनाथाश्रमातील मुलांकडून स्वत:चे पाय दाबून घेण्यापासून ते घरातील सर्व कामं करुन घेत असल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर ज्या मुली सांगितलेलं काम ऐकत नाहीत, अशा मुलींना ती लोखंडी पट्टीनं मारत असल्याचंही एका व्हिडीओमधून दिसत आहे.