पहिल्याच भाषणात सुनेत्रा पवारांचं महिलांना खास गिफ्ट! ‘लवकर या लवकर जा’ योजनेसह आणखी बरच काही…

Sunetra Pawar यांनी पहिल्यांदाच विधान परिषदेमध्ये भाषण केलं. यामध्ये त्यांनी राज्यातील नोकदार आणि सर्वसामान्य महिलांना मोठ्या घोषणा केल्या.

Sunetra Pawar

Sunetra Pawar

Sunetra Pawar gives gift to Womens in her First Speech in Vidhan parishad : राज्याच्या विधिमंडळाचं अर्थ संकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच विधान परिषदेमध्ये भाषण केलं. यामध्ये त्यांनी महिला दिनाचं औचित्य साधत राज्यातील नोकदार महिलांसह सर्वसामान्य महिलांना मोठ्या घोषणा केल्या.

इराण-अमेरिकेच्या युद्धात मोदी सरकारने देशभरात लागू केला ESMA कायदा काय? नक्की काय होणार…

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आतापर्यंत बोललेल्या सदस्यांनी महिला सक्षपत्नीकरणासंदर्भात अतिशय महत्त्वाचे आणि विधायक मुद्दे मांडले शासन या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करेल. आठ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला नारीशक्तीचा गौरव करणारा हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष प्रेरणादायी आहे.

विश्वविजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडला खजिना; मिळणार रोहित ब्रिगेडपेक्षा 6 कोटी जास्त

कारण महाराष्ट्राला त्यामुळे मी महिला दिनाचं औचित्य साधत मी महत्त्वाची घोषणा करत आहे की, मुंबई महानगरपालिकेच्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासणाने कम अर्ली गो अर्ली या संकल्पने अंतर्गत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचारी या सकाळी 9.15 ते 9.45 दरम्यान जितकी मिनिटं आधी कामकाज करतील त्यांना तितकी मिनिटं म्हणजे अर्धा तास अगोदर घरी जाता येणार आहे. यामुळे ट्रेन आणि स्टेशनवर गर्दीच्या वेळी होणारी महिलांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.

2 हजार 558 कोटींची संपत्ती अन् वर्षाला 300 कोटींचं उत्पन्न! कोण आहेत क्राँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार?

हरवलेले मुला-मुलींच्या शोधासाठी मुस्कान तर महिलांसाठी शोध या मोहिमा अगोदर देखील प्रभावी पणे राबवलेल्या आहेत. त्या यापुढे देखील सुरू राहतील. त्याचबरोबर राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणखी प्रभावीपणे राबण्यासाठी प्रयत्न करणार. लाडकी बहिणसह लेक लाडकी, लखपती दिदी, नमो महिला सक्षमीकरण, अन्नपुर्णा या सारख्या योजना राबवत आहे.

Exit mobile version