मोठी बातमी! सुनेत्रा पवार देणार राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा

Sunetra Pawar : विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहे. सी.पी. राधाकृष्णन

Sunetra Pawar

Sunetra Pawar

Sunetra Pawar : विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहे. सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुनेत्रा पवार राजीनामा पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार शपथ घेणार आहे. यापूर्वी आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडणा असून या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात येणार आहे.

19 जून 2024 पासून सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार असून आज आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी 5.30  वाजता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) शपथ घेणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

28 जानेवारी रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांचं बारामती येथे एका विमान अपघातात निधन झाल्याने त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोण सुत्रे हातात घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काल 30 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांची जय पवार, पार्थ पवार आणि सुनिल अरोरा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिल्याने आज त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड करण्यात येणार असून संध्याकाळी 5.30 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.

सुनेत्रा पवार यांच्या शपविधीच्या तयारीला राजभवनामध्ये वेग आला आहे. राज्यपाल दुपारी चार वाजता राजभवान पोहचणार असल्याची देखील आता माहिती समोर येत आहे.

सुनेत्रा पवार शपथविधीसाठी मुंबईत, तर पार्थ पवारांची शरद पवारांच्या बैठकीला हजेरी

Exit mobile version