नवी दिल्ली : ऐन लोकसभा निवडणुकां च्या तोंडावर सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना मोठा झटका दिला आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी अमान्य करत निवडणुकांमध्ये घड्याळ चिन्हाचा वापर न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटीशर्तींनुसार करण्याचे निर्देश अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटाला दिले आहे. याशिवाय शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे दिलेले चिन्ह अंतिम निकाल येईपर्यंत अधिकृत चिन्ह म्हणून मान्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. सोबत अजित पवार गटाने प्रचारात सर्व ठिकाणी घड्याळ हे चिन्ह आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या केसवर अटीशर्तींसह मिळालं आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची याचा अंतिम फैसला झाल्यावर ते कायम होईल, असे डिक्लेरेशन नमूद करण्याचे निर्देशही न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. (Supreme Court On NCP Symbol & Name)
The Supreme Court directs the ECI and State EC to recognise 'Trumpet' as the official election symbol of the Sharad Pawar Faction. Ajit Pawar's NCP is order to Issue Public Notice declaring that 'clock' symbol is subjudice before the Court and that such a declaration should…
— Live Law (@LiveLawIndia) March 19, 2024
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने संख्याबळाच्या आधारावर पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना दिलं होते. याशिवाय अजित पवार यांचा गट हाच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अशी मान्यता निवडणूक आयोगाने दिली. आयोगाच्या याच निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणीवेळी न्यायालयाने शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरण्याची मुभा दिली आहे. निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला देऊ नये असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
काय म्हणालं कोर्ट?
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्ष चिन्ह आणि नाव अजित पवारांना मिळाले होते. तर, शरद पवार गटाला तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाविरोधात शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आले होती. त्यावर सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने पवारांकडून चिन्ह गोठवण्याची मागणी अमान्य केली आहे. तर, अजित पवारांना अंतिम निकाल येईल त्यानुसारच घड्याळ चिन्हाचा वापर करता येईल असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तर, निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह अधिकृत चिन्ह म्हणून तोपर्यंत मान्य करावे, असेही निर्देश कोर्टाने दिलेत.