Download App

हिंजवाजी ‘IT’ पार्क स्थलांतर; राज्य सरकारला उद्योगांबद्दल गांभीर्य नाही, सुळेंची टीका

पुण्यात अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमीत्त अभिवादन केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आयटी पार्क स्थलांतरावरून राज्य सरकारवर टीका केली.

Supriya Sule : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे आपण आदर्शमाता म्हणून बघतो. अगदी लहान वयात त्यांच्यासोबत एक प्रसंग घडला मात्र, त्या खचल्या नाहीत. एक आदर्श जीवन त्या जगल्या आणि लढल्या. (Hinjewadi IT Park) त्यांनी कधीही हार मानली नाही. (Ahilya Devi Holkar) राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर या आमच्या आदर्श माता आहेत. (Supriya Sule) देशातील कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज जयंतीनिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील सारसबागच्या समोरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून अभिवादन केलं. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती; चौंडीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री येणार

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी आयटी पार्क स्थलांतर होण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप केला. महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचे आणखी एक हे अपयश आहे. हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे शरद पवारांच्या दूरदृष्टीतून सुरु झालं. त्यात फेज-1,फेज -2, फेज-3 असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात आलं. येथे देशातून लोक आले, त्यांनी येथे गुंतवणूक केली. आणि आज तिथे काय परिस्थिती निर्माण झाली हे सर्वजण पाहात आहेत असंही सुळे यावेळी म्हणाल्या आहेत. तसंच, त्यांनी या सर्व प्रकाराला राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे.

पुणे अपघात! डॉ. तावरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकलं नाही
राज्यातील सरकारकडे उद्योगांबद्दल गांभीर्य नाही. हे सरकार फक्त घरं फोडा , इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात इतक व्यस्त आहे. त्यांना बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराकडं पाहायला वेळ नाही. पुण्यातील ड्रग्ज आणि पब, बार, आणि कल्याणीनगर अपघात याकडेही सरकारचं लक्ष नाही. तसंच, राज्यात दुष्काळ आहे, कांद्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, ट्रिपल इंजिन सरकार पन्नास खोके घेऊन एकदम ओके असल्याचंही सुळे यावेळी म्हणाल्या.

follow us