पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती; चौंडीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री येणार
Punyashlok Devi Ahilyabai Holkar Jayanti : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 299 जयंती असून, त्या निमित्ताने जामखेड तालुक्यातील त्यांच्या जन्मगावी चौंडी येथे आज मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. (Ahilyabai Holkar) या जयंती सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (Ahilyabai Holkar Jayanti)
Maratha Reservation : गद्दारी करण्याचा चान्स होता पण; जरांगेंचं चौंडीत भावनिक आवाहन
या जयंती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असलेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी पहाटे चौंडीतील महादेव मंदिरात अभिषेक करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केलं. दरम्यान, आजच्या या कार्यक्रमानिमित्त चौंडी येथे मोठी राजकीय लगबग पाहायला मिळत आहे. तसंच, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहाणार असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर, परिसरातील अनेक नागरिक येथे येत असतात त्यांच्यासाठीही येथे पाणी, जेवण अशी सोय करण्यात आली आहे.
धनगर आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी हे अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ आहे. अहिल्यादेवींच्या 299 व्या जयंतीनिमित्त आज चौंडी येथे मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी साडेपाच वाजता महा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दिंडी सोहळा, काल्याचे किर्तन महाप्रसाद असं कार्यक्रमाचं स्वरूप आहे. दुपारी बारा वाजता या जयंती उत्सव सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.
रोहित पवार व लंके मध्ये रात्रीच चौंडीत
अहिल्यादेवींच्या जयंतीचा कार्यक्रम आज भल्या पहाटेपासून सुरू झाला आहे. मात्र, मध्य रात्रीच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार व माजी आमदार निलेश लंके हे चौंडीमध्ये दाखल झाले. रोहित पवार निलेश लंके, नारायण आबा पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत महापूजा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं.