कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शरद पवार करणार ‘खास पाहुणचार’ : अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त शक्तिपदर्शन

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शरद पवार करणार ‘खास पाहुणचार’ : अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त शक्तिपदर्शन

Siddaramaiah On Maharashtra tour : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah)आज (दि.25) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये (Sangli)कार्यकर्ता मेळावा होणार आहे. त्याला महानिर्धार 2024 (Mahanirdhar 2024)असे नाव आहे. त्याचबरोबर आज बारामती (Baramati) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांच्यासोबत सिद्धरामय्या उपस्थित राहणार आहेत.

काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील चौंडी या गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी भाजप आमदार राम शिंदे (Ram shinde)यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपाचे विविध नेते कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्याचप्रमाणे आज कॉंग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. (siddaramaiah-in-maharashtra-tour-sharad-pawar-ahilyadevi-holkar-jayanti-congress-power-show)

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस; सोलापुरात घरांमध्येच शिरलं पाणी…

आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा महाराष्ट्र दौरा महत्वाचा मानला जात आहे. सिद्धरामय्यांचा हा दौरा महाराष्ट्रातील कॉंग्रेस आणि भाजपविरोधी आघाडीला बळ देण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण समजला जात आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशने सांगलीमध्ये दुपारी 12 वा. महानिर्धार 2024 शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. त्यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे भाषण होणार आहे.

Manipur violence: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, विरोधकांनी अमित शहांना घेरले

कर्नाटकमधील विजयानंतर महाराष्ट्र कॉंग्रेसकडून सिद्धरामय्यांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी राज्याचे प्रभारी व कर्नाटकचे मंत्री एच.के. पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

सांगलीमधील कार्यक्रमानंतर सिद्धरामय्या बारामतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला सिद्धरामय्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित असणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube