Download App

‘माझी मुलगी स्वकर्तृत्वाने 3 वेळा खासदार’; शरद पवारांचा मोदींवर पलटवार

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar On PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) काल विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. मोदींनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसवर 70 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप करत तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचे असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा, असं वक्तव्य केलं मोदींनी केलं होतं. दरम्यान, मोदींच्या याच वक्तव्याचा आज शरद पवारांनी समाचार घेतला. (Supriya sule become threee times MP on her self quality said sharad pawar)

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. शरद पवार म्हणाले, माझी मुलगी स्वत:च्या कर्तृत्वाने तीनदा निवडून आली आहे. एखाद्या वेळेला पूर्वजांची पुण्याई उपयोगी पडते. परंतु दुसर्‍या आणि तिसर्‍या निवडणुकांमध्येही ती चांगल्या मताधिक्याने विजयी झाली. त्यानंतरच्या संसदीय परफॉर्मन्समध्ये 98-99 टक्के हजेरी तिची होती. याबाबतीत तिचा प्रथम क्रमांक आहे. तिला आठवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. पण मोदींनी काहीही सांगितलं तरी, तरी स्वत:चं कर्तृत्व असल्याशिवाय, जनता वारंवार निवडून देत नाही. एखाद्या खासदाराबद्दल असे मत व्यक्त करणे योग्य नाही. मी पंतप्रधानांवर वैयक्तिक टीका करत नाही. कारण ती एक इन्स्टीट्यूशन आहे. पण, मोदींनी असं वक्तव्य करणं हे अशोभणीय असल्याची टीका पवारांनी केली.

शिखर बॅंकेचा उल्लेख करण्याची गरजच नव्हती कारण.., मोदींच्या आरोपांवर शरद पवारांचं प्रत्युत्तर 

यावेळी बोलतांना त्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. पण, कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाा. मुलींवर हलले करणं, त्यांना बेपत्ता करणं ह्या गोष्टी सातत्याने राज्यात घडतात. पुणे, ठाणे, मुंबी, सोलापूर या महापालिका कार्यक्षेत्रात जानेवारी 2023 ते 2023 मे या काळात एकूण 2358 मुली महिला बेपत्ता आहेत. त्यात पुण्यातून 937 मुली, ठाण्यातून 721, मुंबईतून 738, तर सोलापूरमधून 62 मुली बेपत्ता झाल्या. त्यामुळं राज्याच्या गृहमंत्र्यांना इतर वक्तव्ये करण्यापेक्षा या महिला कशा बेपत्ता झाल्या? त्याचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली कशा करता येतील, यासाठी काही उपाययोजना कराव्यात, असा सल्ला पवारांनी दिला.

Tags

follow us