Download App

जेजुरी हादरलं! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयाची कोयता-कुऱ्हाडीने हत्या; शेतातच वाहिले रक्ताचे पाट

जेजुरी : नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांची कोयत्या-कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  चार ते पाच जणांनी त्यांच्यावर शेतातच कोयता अन् कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यातच ते गतप्राण झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाचही जणांचा शोध सुरु आहे. पानसरे हे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. (Supriya Sule closed aid and former ncp corporator mehboob pansare killed over land dispute in jejuri)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पानसरे यांची धालेवाडी गावाच्या हद्दीतील नाझरे धरण परिसरात शेती आहे. त्यांचे वनेश प्रल्हाद परदेशी यांच्यासोबत शेत जमिनीवरुन अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. अशात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पानसरे हे शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी 5 जणांनी येत त्यांच्यावर आणि अन्य इतर दोघांवर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार केले.

सभापतीनींच पक्षांतर केले, त्यांच्या पक्षांतर बंदीची सुनावणी कुणासमोर चालणार?

या हल्ल्यात पानसरे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यात आणण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला शेतजमिनीच्या वादातूनच झाला आहे. या प्रकरणी वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती आहे.

कथा महाराष्ट्राच्या राजकारणाची अन् षडयंत्र-कट-कारस्थानाची; शरद पवार येणार मोठ्या पडद्यावर

मेहबुब पानसरे हे खासदार सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. जेजुरी रेल्वे स्टेशन परिसरातून ते नगरसेवक म्हणून निवडून येत होते. या सोबतच ते खंडोबाचे मानकरी आणि निस्सिम भक्तही होते. प्रसिद्ध व्यापारी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता. सामाजिक कार्यात देखील पानसरे अग्रेसर होते. त्यांच्या पत्नीही माजी नगरसेविका आहेत.

Tags

follow us