Download App

VIDEO : संतोष देशमुखांची हत्या, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? धसांनी केला मोठा गौप्यस्फोट

Suresh Dhas Exclusive Interview On Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder) आवाज उठवणं, यामध्ये कोणतंही जातीय, पक्षीय राजकारण नाही. संतोष देशमुख माझ्या भाजपचा बूथ एजंट आहे. 2019 ला प्रितमताईंचा एजंट अन् 2024 ला पंकजाताईंचा एजंट आहे. भारतीय जनता पार्टीचा इतका प्रामाणिक बूथप्रमुख, जर इतक्या बेकार पद्धतीने मारला असेल तर भारतीय जनता पार्टीच्या त्या बूथप्रमुखासोबत राहणं मी पसंत करेन, असं आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी स्पष्ट केलंय. लेट्सअप मराठीच्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

Video : बीड कुणामुळं बदनाम झालं?, पंकाज मुंडे अन् धनंजय मुंडेंच नाव घेत धस यांचा जोरदार पलटवार

राजकारणात यासाठी मला कोणतीही किंमत मोजायची वेळ आली तरी चालेल, पण मी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला सोडणार नाही, असं देखील सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय. या प्रश्नावर आक्रमकपणे बोलत असताना माझे साहेब (देवेंद्र फडणवीस) (Devenra Fadanvis) काहीही बोललेले नाही. चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सर्वांना सोबत घेवून जात असताना त्यांची भूमिका स्वाभाविक असल्याचं देखील सुरेश धस यांनी सांगितलंय. त्यामुळे एकवेळेस ते बोलु नका, असं म्हटलंय.

या प्रकरणात देवेंद्रजी बोलाही म्हटले नाहीत, अन् नका बोलू असं देखील म्हटले नाहीत. मी मात्र रोज बोलतोय. कारण माझा बूथ प्रमुख हरवलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या बूथप्रमुखाची अत्यंत बेकारपणे हत्या झालीय, त्यावर बोलू नका म्हटल्यावर अर्थच उरत नाही. राष्ट्रवादीचे नेते महायुती तुटू शकते, यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, अमोल मिटकरी, सुरज चव्हाण हे काय राष्ट्रवादीचे नेते आहेत का? यावर मुन्नीने बोलावं असं देखील आवाहन सुरेश धस यांनी केलंय. बारक्यांनी माझ्या विरोधात बोलू नये. हे मला तोंडी लावायला पण पुरत नाही, असं धस म्हणालेत.

शिवसेनाप्रमुख समितीतून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा; शिंदेसेनेचा ठराव, फडणवीसांची कोंडी?

अमोल मिटकरी बिचारा चांगला आहे. पूर्ण अभ्यासू आहे, प्रामाणिकपणे काम करतो. तो काही वेडाबिडा नाहीये. पण काय होतंय, तर अमोलचं टायमिंग अन् प्रकरण चुकतंय, असं मला वाटतंय. पक्षात ऐनवेळी बोलायला काही माणसं लागतात, त्यापैकी अमोल एक आहे. पण या प्रकरणात त्याने स्वत: सांगायला पाहिजे होतं की, मला बोलायला लावू नका. या प्रकरणात राजकारण आणू नका. महायुती काही तुटत नाही. महायुती जागेवर राहते.

पाच वर्ष आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत. मागेही ते पाच वर्ष मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक यांचं रेकॉर्ड तोडण्याचं काम सुरू झालंय. आमच्या साहेबांनी त्यांचं अकरा वर्षाचं रेकॉर्ड तोडवं. त्यांचं ध्येय महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचं आहे. देशाच्या दोन नंबरच्या नेत्याने देखील सपोर्ट देवेंद्रजींना केलंय. पुढील काळात सिंचनाच्या बाबतीत महाराष्ट्रात एक नंबरवर जाईल, असा विश्वास आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us