मोठी बातमी! CID ने घेतला वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना; आज कोर्टात हजर करणार
Walmik Karad : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh Case) हत्या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध समित्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवरही या प्रकरणात आरोप होत आहेत. वाल्मिक कराडवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, वाल्मिक कराडबाबत एक महत्वाची बातमी मिळाली आहे. वाल्मिक कराडसह (Walmik Karad) विष्णू चाटेच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला आहे.
मोठी बातमी! वाल्मिक कराडला दणका, शस्त्र परवाना केला रद्द
खंडणीच्या गुन्ह्यानंतर वाल्मिक कराड बरेच दिवस फरार होता. यानंतर त्याने थेट पुण्यात सीआयडी समोर आत्मसमर्पण केले. पुण्यातून त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सीआयडी कोठडी सुनावली. आज या कोठडीची मुदत संपणार असून त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. आज पुढील महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. (MCOCA) याप्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे अशा ७ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. एसआयटीने हा मोक्का लावला असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वाल्मिक कराडवर मात्र मोक्का लावण्यात आलेला नाही. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्याने त्याच्यावर मोक्का लावलेला नाही असे आता सांगण्यात येत आहे.
कराडचा शस्त्र परवानाही रद्द
बीड जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत जिल्ह्यातील शस्त्र परवाने रद्द करण्यास सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यातील शस्त्र परवाना रद्द करण्यासंदर्भात 100 जणांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळी शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. परवाना निलंबित झाल्यानंतर शस्त्र सापडले तर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.
यामध्ये वाल्मिक कराडचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कराड सध्या सीआयडीच्या कोठडीत आहे. त्यामुळे अद्याप ही नोटीस त्याला मिळालेली नाही. कोठडीतून बाहेर आल्यानंतर नोटीस त्याला दिली जाईल असे सांगण्यात आले. आज त्याच्या कोठीडीची मुदत संपणार आहे. याआधीच त्याच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतले आहेत. आवाजाचा नमुना महत्वाचा पुरावा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Video : संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मुंडेंच्या घरी कराड अन् पोलिसांची बैठक; सोनावणेंचा गौप्यस्फोट