Download App

…तुम्ही काय अभिनेत्री रश्मिका मंदाना आहात का?… सुषमा अंधारे यांचा रुपाली चाकणकरांवर प्रहार

विरोधक प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्यावर आणि महिला आयोगावर टीका करतात, असा वार चाकणकर यांनी केला होता. त्यावर

Sushma Andhare on Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांच्यावर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळायला, त्या काय रश्मिका मंदाना आहेत का? असा टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. (Chakankar) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मंगळवार (दि. ३ मे)रोजी मुंबईत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अंधारे बोलत होत्या. मागच्या राज्यपाल महोदयांच्या तुलनेत या राज्यपालांचा नि:पक्षपाती दृष्टीकोन जास्त भावणारा आहे, असंही अंधारे म्हणाल्या आहेत.

विरोधक प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्यावर आणि महिला आयोगावर टीका करतात, असा वार चाकणकर यांनी केला होता. त्यावर रुपाली चाकणकर कोण आहेत? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत की स्मृती इराणी आहेत? त्या कोणत्या क्षेत्रातील सुप्रीमो आहेत. राजकारण, बॉलीवूड की प्रशासन कशातील सुप्रीम आहेत, की त्यांच्यावर बोलल्याने प्रसिद्धी वगैरे मिळते असा पलटवार अंधारे यांनी केला आहे. काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात. त्यांनी या अंधश्रद्धेतून जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर बाहेर यावं अशी कोपरखळीही त्यांनी यावेळी मारली.

अकार्यक्षम महिलेला अध्यक्षपद कोणत्या निकषावर? सुषमा अंधारेंकडून चाकणकरांवर टीकास्त्र अन् ठोंबरेंचं कौतुक

रुपाली चाकणकर यांचे तत्परतेने पुढे येणारे लाडके बंधू सुनील तटकरेंनी चाकणकरांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. चाकणकरांवर बोलण्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटले. त्यासोबतच महिला आयोगावर पूर्णवेळ काम करणारी अध्यक्षा द्या. पार्टी कार्यालयात जनता दरबार भरवणारी महिला काम करु शकत नाही. विशेषत: ज्यांना कायद्याचा परीघ माहिती असणारी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी हवी अशी मागणीही अंधारे यांनी यावेळी केली आहे.

विद्यमान अध्यक्ष चाकणकर या कुठलीही कायद्याची पदवी घेतलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही. ईमेल पाठवण्याला त्या स्यूमोटो म्हणतात, स्यूमोटो कसा करतात त्यांना कळत नाही, याकडं सुषमा अंधार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावर आता रुपाली चाकणकर काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांनी याअगोदर निवडणुकीनंतर काही अडगळीत पडलेल्या महिला नेत्या माझ्या राजीनाम्याची मागणी करतात अशी टीका केली होती.

follow us