Download App

ठाकरी बाणाच्या तोफेसमोर काडतूसाचा… सुषमा अंधारेंकडून फडणवीसांचा समाचार

ठाणे : तुम्ही जर काडतूस आहात तर ठाकरे बाणा म्हणजे तोफ आहे तोफेसमोर काडतूसाचा थांगपत्ता लागत नाही, या शब्दांत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा समाचार घेतला आहे.

Narayaneshwar Mandir Big Breaking : नदी पात्रात सापडले नारायणेश्वर मंदिराचे अवशेष?

आधी तुमच्या घरात घुसलेल्या बाईचा बंदोबस्त करा अन् मग बोला, या शब्दांत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. आज ठाण्यातून ठाकरे गटाच्या महामोर्चाच्या सभेतून सुषमा अंधारे यांनी फडणीसांवर हल्लाबोल केलाय.

Bholaa Box Office Collection: अजयच्या ‘भोला’ची छप्परफाड कमाई, सहा दिवसांत ‘इतक्या’ कोटींची उलाढाल

सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरात 2016 साली एक बाई घुसली होती. अनिक्षा सिंघानी असं तिचं नाव होतं. तिने घरात घुसून स्पाईल केल्याचं फडणवीसांनी सभागृहाच्या पटलावर सांगितलं होतं.

एक बाई तुमच्या घरात घुसते अन् काहीतरी रेकॉर्ड करुन जाते त्याबाबत तुम्हाला काहीच पत्ता लागत नाही. तर मग आधी तुम्ही त्या बाईचा बंदोबस्त करा अन् मगच बोला, अशी खिल्लीही त्यांनी उडवलीय.

ती थुंकी तुमच्याच अंगावर येणार; डावखरेंनी ठाकरेंना सुनावले

ठाण्यातल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फडतूस असं म्हटलं होतं. त्यावर फडणवीस मी काडतूस असल्याचं म्हणतात. पण तुम्ही जर काडतूस आहात तर ठाकरे बाणा म्हणजे तोफ आहे तोफसमोर काडतूसाचा थांगपत्ता लागत नसल्याचा टोलाही सुषमा अंधारेंनी लगावला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना काय करायचंय ते करु द्या, आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे आहेत ते करा, असं खुल आव्हानंच त्यांनी यावेळी फडणवीसांनी दिलं. तसेच “सरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाज ये कातील में है”, या शब्दांत त्यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय.

Tags

follow us