ती थुंकी तुमच्याच अंगावर येणार; डावखरेंनी ठाकरेंना सुनावले

ती थुंकी तुमच्याच अंगावर येणार; डावखरेंनी ठाकरेंना सुनावले

Niranjan Davakhare On Uddhav Thackeray :  ठाण्यातील एका महिलेने मारहाणीचा आरोप केल्यानंतर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन महिलेची भेट घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. यावेळी फडणवीसांना त्यांनी फडतूस असे म्हटले होते. त्यानंतर भाजपचे नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मी फडतूस नाही तर काडतूस आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यानंतर भाजपचे नेते निरंजन डावखरे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारवेळी माजी नौदल अधिकारी व ठाण्यातील नागरिक अनंत करमुसे यांना मारहाण केल्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्या नागरिकांची भेट घेतली नव्हती. तेव्हा कोठे गेला होता, राधासूता तुझा धर्म?, असा टोला भाजपाचे आमदार व ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. निरंजन डावखरे यांनी लगावला आहे.

Sushma Andhare; याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?

ठाण्यात महिलेला झालेली मारहाण समर्थनीय नाही. पण या मारहाणीचे निमित्त साधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विनाकारण टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात, मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे असताना ठाण्यात अनंत करमुसेंना ६ एप्रिल २०२० रोजी, तर मुंबईत निवृत्त नौदल अधिकारी मनोज शर्मा यांना ११ सप्टेंबर रोजी मारहाण झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे वा ठाकरे कुटुंबियांकडून कोणाचीही भेट घेण्यात आलेली नव्हती.

‘झुकेगा नही घुसेगा डॉयलॉग भारीच’ पण, एक बाई तुमच्या घरात.. सुषमा अंधारेंचा फडणवीसांना सवाल

त्यावेळी त्यांनी मारहाण झालेल्या व्यक्तींची भेट घ्यायला हवी होती. आता सत्ता गेल्यानंतर सोयिस्करपणे भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका म्हणजे आभाळाकडे पाहून थुंकण्यासारखे आहे. ती थुंकी त्यांच्यावर येते, असा टोलाही आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube