‘झुकेगा नही घुसेगा डॉयलॉग भारीच’ पण, एक बाई तुमच्या घरात.. सुषमा अंधारेंचा फडणवीसांना सवाल

‘झुकेगा नही घुसेगा डॉयलॉग भारीच’ पण, एक बाई तुमच्या घरात.. सुषमा अंधारेंचा फडणवीसांना सवाल

Sushma Andhare : आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यानंतर फडतूस आणि काडतूस हे शब्द चांगलेच चर्चेत आले आहेत. फडणवीस यांनी फडतूस नहीं काडतूस हूँ मैं झुकेगा नहीं घुसेगा असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंना दिले होते. यावरच  आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांना टार्गेट केल आहे. या प्रकरणावर त्यांनी एक ट्विट केले असून या ट्विटची चर्चा होत आहे.

काय म्हटल्या अंधारे ?

“झुकेगा नही घुसेगा साला” हा डायलॉग भारीच होता पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती हे तुम्हाला सात वर्षे कळले नाही आणि तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात हे काय पटत नाही राव !! असे अंधारे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटची आता जोरदार चर्चा सुरू आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ?

काल ठाणे शहरात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण शिंदे गटाच्या लोकांनी केल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह या कार्यकर्तीची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराष्ट्राला अत्यंत फडतूस गृहमंत्री लाभला आहे. अत्यंत लाचार लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती.

Sushma Andhare; याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल?

फडणवीस म्हणाले मैं हूँ काडतूस

यानंतर गृहमंत्री फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मला फडतूस म्हणाले पण, फडतूस नहीं काडतूस हूँ मैं  झुकेगा नहीं साला घुसेगा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांबरोबर जे राहतात त्यांच्याबद्दल मला काहीही वाटत नाही. वीर सावरकर यांचा अपमान करणारे सडक्या आणि कुचक्या मेंदूचे लोक सावरकरांचा अपमान करतील तो पर्यंत सावरकरप्रेमी रस्त्यावर उतरून या कुचक्या लोकांचा निषेध करत राहतील.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube