संजय शिरसाटांच्या टिकेला सुषमा अंधारेंचं खरमरीत प्रत्युत्तर

मुंबई : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)येथे शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group)पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळावा आयोजित केला होता. त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी आज ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) जोरदार टीका केली आहे. टीका करत असतानाच संजय शिरसाटांची जीभ घसल्याचं पाहायला मिळाले. सुषमा अंधारेंवर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, […]

Sanjay Shirsat Sushma Andhare

Sanjay Shirsat Sushma Andhare

मुंबई : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)येथे शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group)पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळावा आयोजित केला होता. त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)यांनी आज ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंवर (Sushma Andhare) जोरदार टीका केली आहे. टीका करत असतानाच संजय शिरसाटांची जीभ घसल्याचं पाहायला मिळाले. सुषमा अंधारेंवर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, ती बाई सर्वांना म्हणते हे माझे भाऊ आहेत. सत्तार माझे भाऊ, भुमरे माझे भाऊ, काय काय लफडे केले तिने काय माहित? अशा प्रकारची खालच्या पातळीवरची टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

त्यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, संजय शिरसाटांनी माझ्याबद्दल काहितरी सवंग, सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचे माध्यमांकडून समजले. इतरांच्या लेकीबाळीकडे आई किंवा बहिणीच्या नात्याने बघण्यासाठी अंगी शील पारमिता असावी लागते. सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाटसारख्या लोकांकडे अशी शील पारमिता असण्याची सुतराम शक्यता नाही, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे.

Uddhav Thackeray : बीजेपी म्हणजे भ्रष्ट झालेल्यांचा पक्ष!

सुषमा अंधारे म्हणाल्या की, उलटपक्षी सिरसाटच्या बोलण्यातून महाराष्ट्रातील लेकिबाळीकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे? याचाच त्यांनी पुरावा दिला आहे.

म्हणूनच मला शिरसाठ यांच्या बोलण्याचा राग आला नाही. उलट स्वतःची वैचारिक लायकी दाखवून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यामध्ये पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा अशा प्रकारचा हॅशटॅग वापरत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं राजकीय वजन काही महिण्यात चांगलंच वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्या आपल्या विशिष्ट शैलीतून शिंदे गटासह भाजपवरही चौफेर फटकेबाजी करतात. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपकडूनही सुषमा अंधारेंवर जोरदार टीका केली जाते. पण आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पातळी सोडून सुषमा अंधारेंवर टीका केली आहे.

Exit mobile version