Suspended police officer Ranjit Kasle : निलंबित पीएसआय रणजित कासले यांचा एक नवा व्हिडोओ समोर आला आहे. कासले हे निलंबीत पीएसआय अधिकारी असून त्यांना अटकही झाली होती. (Kasle) त्यांनी संतोष देशमुख प्रकरणानंतर अनेकांचं नाव घेत थेट आरोप केले आहेत. आता त्यांनी अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे. राजकीय नेते आणि बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शन उघड करणार असल्याचे कासले म्हणाले. अजित पवारांच्या पक्षातील एका मंत्र्यांचं देखील कनेक्शन असल्याचं ते म्हणाले होते. या आरोपांनंतर आता कासलेंनी थेट अदिती तटकरेंचं नाव घेत गंभीर आरोप केलेत.
चिकन, स्पेशल चहा, झोपायला 6 ब्लॅंकेट वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रिटमेंट कासलेंचा गंभीर आरोप
रणजित कासले सातत्याने गौप्यस्फोट करत आहेत. आता कासलेंनी राजकीय नेते आणि बॉलीवूडचं ड्रग्स कनेक्शन बाहेर काढलंय. विशेष म्हणजे कासलेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आरोप केले आहेत. त्यातंही थेट नाव घेऊन आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसंच, ते आणखी पुरावे असल्याचा दावा करत आहेत.
याअगदोतर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकीवजा इशारा दिला आहे. अजित पवार माझ्या मागे लागले आहेत. शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय. मी जय पवारला कोणत्या हालतमध्ये सोडलंय, स्टेशन डायरी माझ्याकडे आहे. प्रिंटमध्ये-फोटोमध्ये आहे. गरज लागली की एक-एक पत्ता ठेवायचा, सगळंच देऊन मोकळं व्हायचं नाही, असं सूचक वक्तव्य सुद्धा रणजित कासले यांनी त्या प्रकरणाबाबत केल आहे.