मुंबईला हायअलर्ट! अतिमुसळधार पावसाचा इशारा, मान्सून लवकरच महाराष्ट्रात धडकणार…

मुंबईला हायअलर्ट! अतिमुसळधार पावसाचा इशारा, मान्सून लवकरच महाराष्ट्रात धडकणार…

Heavy Rain Alert To Mumbai Maharashtra : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरू (Monsoon Update) असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. एकीकडे शेतकरी हवालदार झाला (Heavy Rain Alert) आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबईत आज सकाळपासून चाकरमान्यांचे हाल होतांना दिसत आहे.

हवामान खात्याकडून मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरात संततधार सुरू (Rain Alert) आहे. समुद्रात येणाऱ्या भरतीमुळे आज रात्री दहा वाजत समुद्र रौद्ररूप धारण करणार (Maharashtra Monsoon Update) आहे. याच पार्श्वभूमीवर भरतीमुळे चार ते पाच मिटर उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यानच्या काळात नागरिकांनी पर्यटकांनी समुद्राच्या जास्त जवळ जाऊ नये, अशा प्रकारचा आवाहन महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. तरी देखील मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरा असो की दादर चौपाटी जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी या ठिकाणी अनेक मुंबईकर आणि पर्यटकांनी गर्दी केल्याचा पाहायला मिळत आहे. अनेक जण समुद्राच्या लाटांचा आणि पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे.

गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलच्या विजयावर शिक्कामोर्तब! अपक्ष उमेदवार शिवाजीराव वराळ यांचा गीतांजली शेळके यांना पाठिंबा

यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय. 2009 नंतर पहिल्यांदाच मान्सून केरळमध्ये इतक्या लवकर दाखल झालाय. दरवर्षी 1 जून रोजी येणारा मान्सून यंदा मात्र 23 मे रोजीच केरळमध्ये पोहचलाय. मान्सूनने केरळबरोबर तामिळनाडू अन् कर्नाटकला घेरलंय. हवामान विभागाने या तिन्ही राज्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

दरम्यान आता मान्सूनची वाटचाल गोव्याकडे सुरु झाल्याचं कळतंय. पुढच्या दोन-चार दिवसांमध्ये मान्सून कोकण-गोव्यात येण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मान्सूनची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे, असं मुंबई येथील विभागीय हवामानशास्त्र केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी टीव्ही नाईनसोबत बोलताना सांगितल्याचं कळतंय.

‘शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय…,’ तुरूंगातून बाहेर येताच, रणजित कासलेंचा थेट अजित पवारांना धमकीवजा इशारा

मुंबई आणि पुण्यात रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु असून पुण्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अधूनमधून रिमझिम पाऊस बरसत आहे. हा पाऊस पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याचं देखील हवामान विभागाने स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube