Download App

राम शिंदेंना झटका! रोहित पवारांच्या कंपनीविरोधातील गुन्ह्याला हायकोर्टाची स्थगिती

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कंपनीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार पवार यांचे नियंत्रण असलेल्या बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीविरोधातील गुन्ह्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मात्र, या गुन्ह्याला न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर.एन. लड्ढा यांच्या खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

कर्जत MIDC चा वाद चिघळला! शिंदेंनी रोहित पवारांकडे मागितला कर्जत-जामखेडचा हिशोब

नेमके प्रकरण काय होते ?

कर्जत एमआयडीसीवरून दोन्ही आमदारांत राजकीय वाद पेटलेला असतानाच ही बातमी येऊन धडकली आहे. राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बारामती अॅग्रो कंपनीने सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप करत भाजप आमदार राम शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर कंपनीनेही तत्काळ हालचाली करत उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

यानंतर पोलिसांनी दाखल केलेला हा गुन्हा रद्द करावा यासाठी कंपनीचे कार्यकारी संचालकांनी अॅड. अक्षय शिंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या याचिकेवर सुनावणी होऊन बारामती अॅग्रो कंपनीविरोधातील गुन्ह्याला अंतरिम स्थगिती देत याचिकेवरील पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली. राम शिंदे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे बारामत अॅग्रो विरोधात तुर्तास कोणतीही कारवाई करू नका असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

 

Tags

follow us