नाल्यांमुळे गंगा प्रदूषित झाली, तसा आयारामांमुळे संघ परिवार प्रदूषित : स्वामी गोविंददेव गिरी

Swami Govinddev Giri : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात भाजपमध्ये इतर पक्षातून अनेकांनी पक्ष प्रवेश केल्याने

Swami Govinddev Giri

Swami Govinddev Giri

Swami Govinddev Giri : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात भाजपमध्ये इतर पक्षातून अनेकांनी पक्ष प्रवेश केल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता या मुद्द्यावर अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या लोकांना यापूर्वी संघ पटला नाही, हिंदुत्व पटले नाही अशा लोकांना आज भाजपमध्ये आयात करण्यात येत असल्याची टीका स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी केली आहे.
पुण्यात (Pune) आयोजित एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना न्याल्यांमुळे जशी गंगा प्रदूषित होते तसा आयारामांमुळे संघ (RSS) परिवार प्रदूषित झाला आहे असं या कार्यक्रमात बोलताना अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govinddev Giri) म्हणाले.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, संघाच्या व्यापक झालेल्या कार्यात वेगवेगळ्या मार्गाने आयात केलेली मंडळी येतात. त्यांचे संस्कार वेगळे आहेत. ज्या लोकांना कधी संघ पटला नाही, हिंदुत्व पटले नाही, त्यांना नैतिकता म्हणजे काय आहे हेच कळत नाही या लोकांची आयात फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. गंगा शुद्धच आहे पण गंगेत येऊन मिसळणाऱ्या नाल्यामुळे ती प्रदूषित झाली आहे. त्यानुसार संघ परिवारही आयारामांमुळे प्रदूषित होईल अशी भीती मला वाटत आहे असं या कार्यक्रमात बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले.
भारतीय संघ करणार नेपाळचा दौरा; खेळणार तीन टी20 सामने
पुढे बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, या शताब्दी वर्षात पूज्य डॉक्टरांपासून अनेक प्रचारकांची नावे समोर येत आहेत. यामुळे डोळे भरून येत आहेत. या लोकांनी जे तप केली, जो त्याग केला, त्या तपाला व त्यागाला न्याय द्यायचा काम असेल तर देश टिकवणे आपली जबाबदारी आहे. यासाठी संघाने सावध राहण्याची गरज आहे असे मला वाटते असेही यावेळी  स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले.
ऑपरेशन टायगर 3, ठाकरेंना पुन्हा धक्का; 10 आमदार सोडणार साथ? –
Exit mobile version