Jalna Maratha Protest : जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागलेत. या घटनेच्या निषेधार्थ अनेक जिल्ह्यात आंदोलनं, निदर्शन आणि बंद पुकारण्यात आला. यामुळं उद्या राज्यभरात होणाऱ्या तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं विद्यार्थ्याच्यावतीने कॉंग्रेसने ही परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, आता तलाठी परीक्षा उद्याच होणार असून त्यासाठी वेळेपूर्वी विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर हजर राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
उद्या राज्यात विविध संघटनांनी बंदची हाक दिली तरीही तलाठी भरती परीक्षा होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचे आवाहन परीक्षा आयोजन करणाऱ्या संस्थेनं केलं. यासंदर्भात सर्व उमेदवारांना मेल पाठवण्यात आला. ज्या संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या संस्थेने सर्व उमेदवारांना मेल पाठवला.
‘राणेंचा षटकार तर शिंदेंचा एक-एक रन’; उद्धव ठाकरेंवर नॉनस्टॉप फटकेबाजी…
लत्यात म्हटले आहे की, जालना येथे घटलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 4 सप्टेंबर राज्यात सर्वत्र तलाठी भरती परीक्षा होणार असून असून सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे. विविध संघटनांनी उद्या बंदची हाक दिल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपण परीक्षा केंद्रावर येण्याबाबत आपल्या स्तरावर नियोजन करून परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी.
कॉंग्रेससची मागणी
राज्यात उद्या होणारी तलाठी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर काल राज्यात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. शिवाय अनेक ठिकाणी एसटी बसेसही बंद आहेत. परीक्षार्थींना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून परीक्षा पुढे ढकलण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. तर राज्यात सध्या अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था बंद आहे, उद्या अनेक ठिकाणी आंदोलन होणार आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाने अशा मुलांची संधी हुकल्यास त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीन केली.