‘राणेंचा षटकार तर शिंदेंचा एक-एक रन’; उद्धव ठाकरेंवर नॉनस्टॉप फटकेबाजी…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याची परिस्थिती दिसून येत आहे. एकीकडे राज्यात मुख्यमंत्र्यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या निर्धार सभा सुरु आहेत. या दोन्ही सभांमधून ठाकरे-उद्धव गटाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. अशातच मुंबईतील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी केलीयं.
मार मुसंडी! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार, तारखा जाहीर…
नारायण राणे म्हणाले, आम्ही जेव्हा शिवसेना वाढवत होतो, तेव्हा उद्धव ठाकरे आठ वर्षांचा होता. उद्धव ठाकरेंनी आत्तापर्यंत एकाही आंदोलनात भाग घेतला नाही, शिवसेना जिंदाबादच्या घोषणा कधी दिल्या नाहीत, तो घाबरतो उच्चार स्पष्ट येईल की नाही, याची भीती असते. त्याकाळी शिवसेना आणि बाळासाहेबांविरोधात जो कोणी बोलेल त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्हाला झोप नसायची. आम्ही दोन दोन दिवस त्या माणसाच्या जिन्याखाली वाट पाहायचो. उद्धव ठाकरेनी कधी दोन तास तरी पाहिलीयं का? माझं तोंड उघडलं तर मातोश्रीची दार उघडणार नाहीत, असे टोले राणेंनी लगावलेत.
नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील सापडले बेवारस अवस्थेत, रुग्णालयात उपचार सुरू
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राणेंनी चौकार षटकार ठोकलेत आता मी काय एक एक रन काढतो, या शब्दांत मिश्किलपणे शिंदेंनी टीका केली आहे. पक्ष संघटनेत कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहवं लागतं, त्यांना बळ द्यावं लागतं, कार्यकर्तेच मतदारांच्या घरी जातात , अडचणीच्या काळात उभं राहिलं तर तो कार्यकर्ता पक्षाला विसरणार नाही. तुम्ही पाळाल तरच पक्ष मोठा होईल , शेवटी नियती कोणालाच सोडत नाही नशिबात असेल तर कोणी देऊ शकत नाही, अशीही टीका त्यांनी केली आहे.
Shilpa Shetty Look: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा लेहंग्यातील अनोखा अंदाज पाहिलात का?
तसेच गुवाहाटीला गेलो तेव्हा अनेकांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं की, ते लोकं जे करीत आहेत ते योग्य आहे पाठिंबा जाहीर करा पण अहंकाराने भरलेली लोकं पाठिंबा देण्याचा निर्णय घेत नाहीत. आज ते जे लोटांगण घालताहेत त्यांना इंडिया आघाडीत लोटांगण घालावं लागलं नसतं, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
Ram Shinde यांच्या हस्तक्षेपामुळे नगरपंचायतीत पदे रिक्त; शिंदेंविरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक
दरम्यान, आम्ही दिल्लीला जातो, मोदींना उद्घाटनाला बोलावतो त्यात वावगं काय आहे, मोदींना बोलवल्याने अनेकांचा जळफळाट होतो. सत्ता स्थापन झाल्यापासून आम्ही विकास करतो आहे, त्यामुळेच आमच्यावर टीका टीपण्ण्या केल्या जात आहेत, कोविडमध्ये माणसं मरत होती अन् हे लोकं पैसे कमवत होते, कुठे फेडणार हे पाप असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
खासदार गजानन किर्तीकर यांच्या ‘शिवसेना लोकाधिकार आणि मी’ या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मुंबईतल्या सहारा हॉटेल येथे हा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे, गजानन किर्तीकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमात राणे आणि शिंदेंनी केलेल्या टीकेवर आता उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देणार याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.