मार मुसंडी! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार, तारखा जाहीर…

  • Written By: Published:
मार मुसंडी! महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार, तारखा जाहीर…

Maharashtra Kesari Wrestling Tournament : राज्यातील मानाची आणि लोकप्रिय कुस्ती स्पर्धा अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) थरार यंदा धाराशिवमध्ये (Dharashiva) रंगणार आहे. धाराशिवमध्ये होणारी ही 65 वी कुस्ती स्पर्धे आहे. यंदा ही स्पर्धा 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने दिली आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पडली होती. पंचांच्या निर्णयामुळे त्या स्पर्धेची चर्चा बराच काळ सुरू होती. दरम्यान, आता यंदा प्रथमच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान धाराशिव जिल्ह्याला मिळाला आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्यानंतर आज ही घोषणा करण्यात आली. धाराशिव जिल्ह्याला प्रथमच या स्पर्धेचा मान मिळाला असून या स्पर्धेचे आयोजन धाराशिव जिल्हा कुस्ती तालीम संघ आणि आदर्श शिक्षा प्रसारक मंडळातर्फे करण्यात येणार आहे.

मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचे हिंगोलीत तीव्र पडसाद; सरकारी गोदाम पेटून दिले 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आणि राज्यातील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा होणार आहे.

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या सर्व लढती तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणार आहे. ही स्पर्धा 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. या स्पर्धेत मानाच्या विविध जिल्ह्यांतील 45 संघ सहभागी होणार आहेत. त्यातून 450 खेळाडू माती आणि 450 खेळाडू गादी गटात असे 900 खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा माती आणि गादी असे 20 वेगवेगळ्या वजनी गटात होणार आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुमारे 2 कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिले बक्षीस चांदीची मानाची गदा आणि 30 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ एन कार, तर दुसरे बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर असेल. 20 गटात होणाऱ्या प्रत्येक गटातील प्रथम विजेत्याला एक बुलेट आणि रोख पारितोषिक देण्यात येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube